एक्स्प्लोर

Khichdi Scam : संजय राऊत यांचा धाकटा भाऊही अडचणीत, संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

BMC Khichdi Scam Case : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत (Sandeep Raut) यांच्या खात्यात पैसे आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात (BMC Khichdi Scam Case) खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांचे भाऊ संदीप राजाराम राऊत (Sandeep Raut) यांची चौकशी होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police EOW) संदीप राऊत यांना नोटीस देऊन शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. खिचडी घोटाळा प्रकरणातील पैसे संदीप राऊत यांनासुद्धा मिळायचे असा आरोप करण्यात आला आहे. 

संदीप राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खिचडी घोटाळा प्रकरणात या अगोदर उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांचीसुद्धा चौकशी झाली होती. 

BMC Khichdi Scam Case : खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय? 

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे. 

खिचडी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल 

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. कथित बॉडी बॅग प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणी आता संजय राऊत यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांचीही चौकशी होणार आहे. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget