मुंबईत बॅन केलेल्या प्लास्टिकवरुन BMCचं कडक धोरण, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह जेलही!
BMC Issues Fresh Directive Against Use of Banned Plastic : मुंबईत बॅन केलेल्या प्लास्टिकवरुन BMCचं कडक धोरण. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह जेलही!
BMC Issues Fresh Directive Against Use of Banned Plastic : मुंबईकरांनो... प्लास्टिकच्या पिशव्या वापरताय? सावध व्हा. नाहीतर खिशाचा मोठा चाप बसू शकतो. मुंबई महापालिकेनं बंदी घातलेलं प्लास्टिक (PLASTIC) वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. असे निर्देशही पालिकेच्या वतीनं देण्यात आले आहेत. कोविड-19 (Covid-19) महामारीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी ठप्प झाली होती. राज्य सरकारनं 2018 मध्ये प्लास्टिकच्या उपयोगावर रोख लावण्यासाठी एक अधिसूचना जारी केली होती. दरम्यान, आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बीएमसीनं बुधवारी नागरिकांना आणि व्यावसायिकांना बंदी घातलेलं प्लास्टिक न वापरण्याचं आवाहन केलं आहे.
नियमांचं उल्लंघन केलं तर मोठी कारवाई
मुंबई महापालिकेनं दिलेल्या आदेशानुसार, उत्पादक, व्यावसायिक, ग्राहकांनी जर पहिल्यांदा आदेशाचं उल्लंघम केलं तर 5000 रुपये आणि त्यानंतर जर पुन्हा उल्लंघन केलं तर 25 हजारांचा दंड आणि तीन महिन्यांसाठी तुरुंगवास, अशी कारवाई केली जाईल. बीएमसीच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, प्लास्टिक बंदीनंतरही प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आल्यामुळे महापालिकेनं कारवाई करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
नियम मोडणाऱ्यांकडून आतापर्यंत 5 कोटींची दंडवसुली
महाराष्ट्र डिग्रेडेबल अँड नॉनडिग्रेडेबल वेस्ट (कंट्रोल) अॅक्ट, 2006 अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिकचं उत्पादन, वाहतूक, विक्री, साठवणूक, वापर करण्यावर बंदी आहे. जून 2018 पासून बीएमसीनं आपल्या अभियाना दरम्यान जवळपास 2 लाख किलोग्राम बंदी असलेलं प्लास्टिक जप्त केलं होतं. नियम मोडणाऱ्यांकडून आतापर्यंत महापालिकेनं 5 कोटींचा दंड जप्त केलं आहे. बीएमसीनं प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करण्याऱ्यांवर कारवाई करण्यासाठी काही पथकांची नेमणूक केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :