एक्स्प्लोर
मुंबईत रुफ टॉप हॉटेलांना अखेर महापालिकेची परवानगी
महापालिकेत सादर झालेली पॉलिसी सभागृहात अडकली होती. मात्र त्यात बदल करुन अखेर रुफटॉप हॉटेल पॉलिसीला आयुक्तांनी मंजुरी दिली

मुंबई : मुंबईत गच्चीवरील हॉटेलांना अखेर परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी मंजुरी दिली. रुफटॉप हॉटेल्स हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासंदर्भात महापालिकेत सादर झालेली पॉलिसी सभागृहात अडकली होती. मात्र त्यात बदल करुन अखेर रुफटॉप हॉटेल पॉलिसीला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. रुफटॉप हॉटेलपासून 10 मीटर अंतरावर कोणतीही निवासी इमारत नसावी, अशी अट घालण्यात आली आहे. तसंच मॉल आणि लॉजिंग भागात रुफटॉप हॉटेलला परवानगी आहे. अशा काही बाबी पॉलिसीत सामाविष्ट करण्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना महापालिकेचे आभार मानले आहेत https://twitter.com/AUThackeray/status/925707606743711744 https://twitter.com/AUThackeray/status/925707830648242177 https://twitter.com/AUThackeray/status/925719867193544704 https://twitter.com/AUThackeray/status/925720745556115456
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























