एक्स्प्लोर

BMC Elections : मुंबई जिंकण्यासाठी भाजपचं 150 मिशन काय आहे? वाचा सविस्तर

BMC Elections : पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी शिवसेना, भाजपसह इतर पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

BMC Elections : पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी शिवसेना, भाजपसह इतर पक्षांनी तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षानं आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई भाजपाची कार्यकारणी बैठक पार पडली. आज पार पडलेल्या बैठकीला भाजपचे मुंबईतील खासदार,आमदार, नगरसेवक आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.  या बैठकीत मुंबई जिंकण्यासाठी भाजपानं मिशन 150 ठरवलं आहे. पण हे मिशन 150 नमकं आहे तरी काय? मिशन 150 ची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

आगामी मुंबई महापालिका दृष्टीने पक्ष संघटन आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी मिशन 150 ही भाजपची दादर कार्यालयांत महत्वपूर्ण बैठक होती. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेश भाजपा कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत विनोद तावडे ( राष्ट्रीय सरचिटणीस, भाजपा), चंद्रशेखर बावनकुळे ( प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजपा) , पूनम महाजन, आशिष शेलार, यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सूचना दिल्या. भाजपच्या मिशन 150 ला आजपासून सुरुवात झाल्याचं  बोललं जातेय. 

मुंबई भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आज नेमकं काय घडलं ?

  • मुंबई पालिकेत 150 नगरसेवक निवडून येतील, या दृष्टीने नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले
  • शिवसेनेच्या कार्याकाळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा राजकीय ठराव मांडण्यात आला. त्यानुसार प्रत्येक विभागात जाऊन हे मांडले जाईल. 
  • प्रत्येक वॉर्डमध्ये विरोधकांची स्थानिक पातळीवरील चुकीची कामे लोकांच्या निदर्शनास आणा.. 
  • ज्या विभागात भाजपची मोठया प्रमाणात ताकद नाही, त्याठिकाणी पक्ष संघटन आणखी मजबूत आणि विविध कार्यक्रम राबवण्यासाठी निर्णय झाले.
  • राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करण्याचा सूचना देण्यात आल्या.
  • मुंबईतील मूलभूत सोयीसुविधा लोकांना मिळाल्यात का हे पहा आणि त्या आपल्या मार्फत पोहचवा.
  • माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भर देण्याविषयी मार्गदर्शन झाले. 
  • जिथे भाजपचा नगरसेवक तिथे भाजप उमेदवार दिला जाईल , जिथे सेनेचा तिथे शिंदे गट किंवा आपला चांगला उमेदवार देऊ.. इतर पक्षाचे नगरसेवक आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपला जोर लावा, त्या जागा आपण लढवू असे सांगण्यात आले. 
  • आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे ते कसे साध्य केले जाईल याचे समीकरण विनोद तावडे , चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी मांडले.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget