एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत 110 जागांवर विजयाचा अंदाज : शिवसेना
मुंबई: मुंबई महापालिकेसाठी यंदा विक्रमी 55.28 टक्के इतकं मतदान झालं आहे. वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, कोणाला फटका बसणार याची चर्चा सुरु झाली असताना, शिवसेनेच्या अंतर्गत यंत्रणेचा फीडबॅक रिपोर्ट 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.
या सर्व्हेनुसार स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचू असा अंदाज शिवसेनेला आहे. शिवसेनेने एकूण 227 जागांपैकी 202 जागांचा अंदाज बांधला आहे. या 202 जागांपैकी तब्बल 110 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे.
मुंबईत स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी 114 जागांची गरज आहे. त्यामुळे हा आकडा सहज पार करु असा अंदाज शिवसेनेने आपल्या सर्व्हेतून वर्तवला आहे.
शिवसेनेच्या अंदाजानुसार मुंबई महापालिकेतील अपेक्षित आकडेवारी (ढोबळ) :
दक्षिण मुंबई -(मलबार हिल, गिरगाव, कुलाबा, भायखळा) - 8/18
मध्य दक्षिण मुंबई -(शिवडी, लालबाग, वरळी) - 11/16
मध्य मुंबई - (वडाळा, धारावी, माहीम/दादर) - 9/18
पूर्व-पश्चिम मुंबई -(घाटकोप पूर्व/पश्चिम, गोवंडी - 8/19
उत्तर पूर्व मुंबई- (मुलुंड, भांडुप, विक्रोळी) - 10/19
मध्य पूर्व मुंबई (सायन, देवनार, चेंबुर - 8/18
मध्य पश्चिम मुंबई (कुर्ला, कलिना, चांदिवली, सांताक्रुझ) - 12/21
पश्चिम मुंबई (वांद्रे, वर्सोवा, अंधेरी) - 18/36
उत्तर पश्चिम मुंबई (गोरेगाव, जोगेश्वरी) - 16/21
उत्तर मुंबई (दहिसर, बोरीवली) - 10/16
202 पैकी 110 जागा आपणच जिंकू असा अंदाज शिवसेनेला आहे. उर्वरित 25 जागांचा ताळेबंद/अंदाज शिवसेनेला आलेला नाही.
दरम्यान, कालच निवडणूक संपल्यानंतर अॅक्सिस-इंडिया टुडेचा एक्झिट पोल जाहीर झाला. या सर्व्हेनुसार शिवसेनेला मुंबईत 86-92 जागा मिळेल असा अंदाज आहे.
अॅक्सिस-इंडिया टुडेचा मुंबई एक्झिट पोल
शिवसेना- 86-92
भाजप- 80-88
मनसे-5-7
काँग्रेस-30-34
राष्ट्रवादी- 3-7
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement