एक्स्प्लोर

धाडस दाखवा, राम कदमांवर कारवाई करा, उद्धव यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसाने राम कदमांवर कारवाई करावी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

मुंबई: वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार राम कदम यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये. तसंच माता-बहिणींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसाने राम कदमांवर कारवाई करावी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याप्रकरणी जोरदार हल्ला चढवला. ‘मुलीने विरोध केला तरीही तिला पळवून आणून तुम्हाला देणार’ असं वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात केलं. राम कदम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होती. उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजप आमदाराने तारे तोडले आहेत. प्रशांत परिचारिक, श्रीपाद छिंदम असेल किंवा राम कदम असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढंच नाही तर यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये" तसंच भाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केलं आहे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्यावर धाडसाने कारवाई करण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं. राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी हार्दिक पटेलला पाठिंबा गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचं आरक्षणासाठी गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी फोन करुन या उपोषणाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. शिवाय तुझ्यासारख्या लढवय्यांची गरज आहे, त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती केली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दहीहंडीच्या कार्यक्रात राम कदम नेमकं काय म्हणाले होते? "कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले. खेद व्यक्त, पण माफी नाहीच "कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट 54 सेंकंदांचं विधान काही विरोधकांनी पसरवून संभ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी! आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आक्षेप घेतला नाही, कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते", असं राम कदम यांनी ट्वीट केलं आहे. संबंधित बातम्या "मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा" प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं! पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल  राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी  राम कदम माफी मागा नाहीतर, चपलेने हाणू : अॅड. स्वाती नखाते पाटील 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget