एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपचा महामेळावा संपला, मुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीची चिन्हं
मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुंबई: मुंबईत आयोजित करण्यात आलेला भाजपच्या महामेळाव्याचा समारोप झाला आहे. मात्र आता समारोपानंतर मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. खासकरुन वांद्रे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची गर्दी होईल, अशी चिन्हं आहेत.
कालपासून भाजपच्या महामेळाव्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होत आहे. आज सकाळीही अशीच परिस्थिती होती. अनेक मुंबईकरांनी याविरोधात वांद्रेत भाजप कार्यकर्त्यांच्या बसदेखील रोखल्या होत्या.
आता भाजपचा हा महामेळावा संपला आहे. त्यामुळे राज्यभरातून मुंबईत आलेले भाजप कार्यकर्ते परतीच्या वाटेला लागले आहेत. त्यामुळे पुन्हा मुंबईत वाहतूक कोंडी होणार हे अटळ आहे.
मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांची गर्दी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह सर्वच रस्त्यांवर असेल. त्यातच आता कार्यालयं सुटण्याची वेळ होईल. त्यामुळे नोकरदार/चाकरमानी घरी परतण्यासाठी निघेल. त्यामुळे गर्दीत वाढ होऊन, ट्रॅफिक जॅम होण्याची चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement