एक्स्प्लोर
Advertisement
शिवरायांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात, राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांचा फोटो
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून उभे असल्याचं फोटोत दिसत आहे.
उल्हासनगर : भाजप नेते, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर रवींद्र चव्हाण हात ठेवून उभे असल्याचं दिसत आहे. या फोटोमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या पंचम कलानी महापौरपदी बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी नवनिर्वाचित महापौरांसह ओमी कलानी, रवींद्र चव्हाण गेले होते. त्यावेळी चव्हाण यांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवल्याची माहिती आहे.
हा फोटो हाती लागल्यानंतर 'एबीपी माझा'ने रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
रवींद्र चव्हाण हे फडणवीस सरकारमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण या मंत्रालयांचे राज्यमंत्री आहेत. 2009 आणि 2014 अशा सलग दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर डोंबिवलीतून आमदारकी मिळवली आहे.
यापूर्वी अहमदनगरमध्ये उपमहापौर असलेल्या भाजपच्या श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका फोन संभाषणात अपशब्द वापरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement