एक्स्प्लोर

गणेश नाईक आहेत कुठे? पोलिसांकडून शोध सुरु; बलात्काराच्या गुन्ह्यानंतर अटकेची टांगती तलवार कायम

BJP MLA Ganesh Naik : भाजप नेते गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु झाला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यानंतर अटकेची टांगती तलवार कायम

BJP MLA Ganesh Naik : भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं नवी मुंबई पोलिसांकडून भाजप आमदार गणेश नाईकांचा शोध सुरु आहे. गणेश नाईकांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. कोपरखैरणेमधलं घर, कार्यालय आणि मुरबाडमधल्या फार्महाऊसवर पोलिसांचं पथक गणेश नाईकांचा शोध घेणार आहेत. दरम्यान, गणेश नाईकांवर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. दीपा चौहान असं या महिलेचं नाव असून त्यांनी यासंबंधित महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. याचीच दाखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. 

काय आहे प्रकरण?

दीपा चौहान यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या बरोबर आपले गेल्या 27 वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये आहे. या प्रेमसंबंधातून 15 वर्षाचा मुलगा झाला असून त्याला गणेश नाईक यांनी वडीलांचे नाव द्यावे, अशी मागणी दीपा चौहान यांनी केली आहे. गणेश नाईक यासाठी नकार देत असल्याने थेट पोलीस ठाणे गाठत दीपा चौहान यांनी गणेश नाईकांवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी दीपा चौहान यांनी महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली असून वेळ पडल्यास कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आपली गणेश नाईक यांच्या बरोबर भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मुलाबरोबर सुरू असलेले बोलणे ही गणेश नाईक यांनी बंद केल्याचेही दीपा चौहान यांनी सांगितले.

भाजप आमदार गणेश नाईक यांना त्वरित अटक करा, रुपाली चाकणकर यांचे निर्देश

याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीनंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत की, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी या पीडित महिलेने प्रत्यक्ष भेट देऊन आपल्यासोबत घडलेली घटना महिला आयोगाला सांगितली. यामध्ये पीडितेने जी तक्रार राज्य महिला आयोगाकडे दिली, याची दखल घेऊन मुंबई पोलिसांना यासंबंधित तपास करून याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तपास करत असताना पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात 506 ब हा गुन्हा दखल केला. 16 तारखेला नेरुळ पोलीस ठाण्यात 376 हा गुन्हा दखल केला. हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे 376 हा बलात्काराचा गुन्हा गणेश नाईक यांच्यावर दाखल झाला असताना, पोलिसांनी गणेश नाईक यांना अटक करावी, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच याचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.    

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ritu Tawde: रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Babar Azam : बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Donald Trump on Mojtaba Khamenei: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा; म्हणाले...
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा; म्हणाले...
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Embed widget