एक्स्प्लोर

BJP : मिशन मुंबई, महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा प्लॅन ठरला!

BJP Mission Mumbai : मुंबई महापालिका जिंकण्याची जबाबदारी प्रत्येक आमदारांवर असून प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मुंबई जिंकून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या आमदारांसोबत रविवारी रात्री दीड तास बैठक घेतली असून, या बैठकीत भाजपचा मुंबईसाठीचा मास्टर प्लॅन ठरला. काय आहे हा मास्टर प्लॅन? जाणून घेऊयात एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपनं आत्ता मुंबईची सत्ता अर्थात पालिका काबीज करण्यासाठी मास्टल प्लॅन आखला आहे. हा प्लॅन ठरला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत. महापालिका जिंकण्यासाठीची जबाबदारी आमदारांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु आहेत. या दोन्ही नेत्यांची ताकद, सर्वाधिक मतदार हे मुंबईत असून प्रामुख्यानं मराठी मतदारांवर या दोघांची मदार आहे. त्यामुळे भाजपनं ही संभाव्य युती लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या आमदारांना काही निर्देश दिले आहेत. मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना दिल्या आहेत, त्यामुळे भाजप मुंबई महापालिका निवडणुका महायुतीतूनच लढणार हे जवळपास स्पष्ट आहे.

BJP Mission Mumbai : मुंबईसाठी भाजपनं काय प्लन आखला?

- मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यावर पुढील तीन महिने भर.

- मुंबई महापालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी.

- मुंबईतील भाजपचा आमदार प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेणार.

- मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा, मुख्यमंत्र्यांची सूचना.

याशिवाय 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा, दुसऱ्या क्रमांकावरची मतं मिळालेल्या जागा निवडून आणण्याकरता भाजपचा प्रयत्न राहल. याशिवाय स्वबळावर निवडून येणाऱ्या काँग्रेस आणि इतर पक्षातील उमेदवारांना हेरुन त्यांना भाजपमधून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा लढती तयार करण्याचा प्लॅन भाजपनं आखल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करणं, मुस्लिम, हिंदी भाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणाऱ्या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपलंसं करणं असा प्लॅन आखण्यात आला आहे.

दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र या सणांच्या माध्यमातून मतांची विशेषत: मराठी मतांची जोडणी करणं असा रोडमॅप भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी तयार केला आहे. हा रोडमॅप अखेरपर्यंत अनेक वळणंही घेऊ शकतो. याशिवाय मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी रस्ते काँक्रीटीकरणाची कामं, कोस्टल रोड, मेट्रो, मुंबईतल्या शहरांचं सौंदर्यीकरण अशा विविध विकासकामांचं भूमीपूजन, लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे.

तेव्हा भाजपनं मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु केली असून, यात भाजपला कितपत यश येतं हे मात्र येणारा काळच ठरवेल.

ही बातमी वाचा:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget