एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर युतीच्या मुद्द्यावर खलबतं

मुंबई : मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. मुंबईतल्या युतीसंदर्भात वर्षा बंगल्यावर या बैठकीत खलबतं होणार आहेत. शनिवारी रंगशारदा येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेनं दिलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आशिष शेलार, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, योगेश सागर, विद्या ठाकूर हे नेते उपस्थित आहेत. बैठकीत भाजप युतीसाठी नवीन फॉर्म्युला तयार करणार का अशी चर्चा रंगली आहे. युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वर्षा बंगल्यावर सुरु असलेल्या बैठकीकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीसंदर्भातील तिसरी बैठक पार पडली. पण या बैठकीत भाजपकडून देण्यात आलेला 114 जागांचा प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला. शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे युतीबाबतच्या तिसऱ्या बैठकीतही तणाव कायम होता. दोन्ही पक्षांनी एकमेकांचा प्रस्ताव नाकारल्यानं युती तुटण्याची चिन्हं निर्माण झाली. नोटाबंदीच्या डेडलाईन हुकल्या, मग युतीच्या चर्चेस डेडलाईन का?, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी दुपारी भाजपला लगावला होता. तसंच युतीबाबत अद्याप ठोस प्रस्ताव आलेला नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठाम भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय, याबाबतही जनतेच्या मनात संभ्रम आहे.

संबंधित बातमी :

...मग युतीसाठी डेडलाईन का? : उद्धव ठाकरे

शिवसेनेकडून मुंबई आणि ठाणेकरांसाठी घोषणांचा पाऊस

शिवसेनेच्या प्रस्तावानं भाजप नेते संतापले, बैठकीतच सेना नेत्यांना सुनावलं!

पाहुण्याला जेवायला ताट द्यावे, पण स्वत:चा बसायचा पाट देऊ नये: गोऱ्हे

युतीच्या तिसऱ्या बैठकीत नेमकं काय झालं?

युतीची बोलणी फिस्कटली, शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव

रामदास कदम यांची शेलार आणि सोमय्या यांच्यावर खालच्या शब्दात टीका

एबीपी माझा सर्व्हेचा निकाल: युतीबाबत मुंबईकरांना काय वाटतं

शिवसेना-भाजपची युतीसंदर्भातील तिसरी बैठक, वेळ आणि ठिकाण ठरलं!

एबीपी माझा सर्व्हे : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का?

मुंबई महापालिकेसाठी भाजपची 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार

शिवसेनेला आताच उपरती का? तावडेंचा सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
Bank Holiday : या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
बँका या आठवड्यात सलग चार दिवस बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
पाकिस्तानच्या भूमिगत अणवस्त्र चाचणीमुळं भूकंप येतात, आता अमेरिकेला देखील अणवस्त्र चाचणी करावी लागेल  : डोनाल्ड ट्रम्प
संपूर्ण जगाला 150 वेळा उडवून देता येईल इतकी अणवस्त्र आमच्याकडे, चाचण्या सुरु करणार: डोनाल्ड ट्रम्प
Palghar Farmer News: भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bawankule on Thackeray : महाराष्ट्राचे पप्पू कोण हे सगळ्यांना माहितीये- बावनकुळेंचा टोला
Maharashtra Politics: 'शेलारांनी फडणवीसांना नकळत पप्पू ठरवलं', Uddhav Thackeray यांचा टोला
Voter List Row: 'बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल आभार', Rohit Pawar यांचा Ashish Shelar यांना टोला
Bogus Voters: 'तुमची बोबडी का वळली?', Ashish Shelar यांचा Raj आणि Uddhav Thackeray यांना थेट सवाल
Voter List Row: दुबार मतदारांवरून भाजप-मनसेत जुंपली, शेलारांचा ठाकरेंना थेट सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
Bank Holiday : या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
बँका या आठवड्यात सलग चार दिवस बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
पाकिस्तानच्या भूमिगत अणवस्त्र चाचणीमुळं भूकंप येतात, आता अमेरिकेला देखील अणवस्त्र चाचणी करावी लागेल  : डोनाल्ड ट्रम्प
संपूर्ण जगाला 150 वेळा उडवून देता येईल इतकी अणवस्त्र आमच्याकडे, चाचण्या सुरु करणार: डोनाल्ड ट्रम्प
Palghar Farmer News: भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
Gold Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या  
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याचे दर पुन्हा वाढले, नवी दिल्ली ते मुंबईसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या
Pune Accident: 120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
120 चा सुस्साट स्पीड, हँड ब्रेक ओढताच भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, पुण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai News: तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा कोर्टातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा कोर्टातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Embed widget