एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'शेलारांनी फडणवीसांना नकळत पप्पू ठरवलं', Uddhav Thackeray यांचा टोला
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार निशाणा साधला आहे. 'विरोधक घोटाळे करतात, म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात,' असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आशिष शेलार यांनी नकळतपणे देवेंद्र फडणवीस यांना 'पप्पू' ठरवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत, हा भाजपमधील अंतर्गत वादाचा परिणाम असल्याचे ठाकरे म्हणाले. एवढेच नाही, तर मतदार यादीतील घोळाला (Voter List Scam) 'निवडणूक आयोगाची भुताटकी' संबोधत, एकाच घरात ४०-५० नावे नोंदवली गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ५ तारखेपासून सुरू होणाऱ्या मराठवाडा दौऱ्यात (Marathwada Tour) शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण झाले की नाही, हे तपासणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















