एक्स्प्लोर
भाजप महिला पदाधिकाऱ्याला 2 महिने कारावास, 6 लाख दंड; कोर्टाचा निकाल

कल्याण: कल्याणमधील भाजपच्या पदाधिकारी रक्षंदा सोनवणे यांना 2 महिन्याचा कारावास आणि 8 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चेक बाऊन्स आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी उल्हासनगर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. रक्षंदा सोनवणे या केंद्र सरकारच्या नभोवाणी तथा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सदस्याही आहेत. फिर्यादी कृष्णा मांडगे यांच्याकडून रक्षांदा यांनी 6 लाख 70 हजार रुपये घेतले होते. याप्रकरणी मांडगेंनी सोनावणेंवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं रक्षंदा यांना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, रक्षंदा सोनावणे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 'माझ्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोप खोटे आहेत. भारत सरकारच्या दोन मोठ्या समित्यांवर माझी नेमणूक करण्यात आल्यामुळे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरु आहे.'
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























