Kirit Somaiya : राऊतांनी केलेल्या आरोपावर चौकशीसाठी तयार; किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून भाजप नेते किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. त्यावर सोमय्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं. ट्वीटच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर आरोप करणारे संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "2017 साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचे नाव घेतलं आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध 10 खटले दाखल केले आहेत तर अजून तीन तीन खटले पाईपलाईनमध्ये आहेत. मला त्यांची परिस्थिती समजते. मी आणखी एका प्रकरणाचं स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेलो नाही."
I understand his situation
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 15, 2022
I welcome 1 more Case/Investigation We have not done anything wrong. Indulged in any corrupt practices
Why Mr Thackeray & Raut not responding The COVID Centre Scam?
Relationship with Pravin Raut, Sujeet Patkar
Our fight against corruption will go on
माझ्यावर आरोप करणारे संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे. प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी राऊतांचा काय संबंध? असा सवाल विचारत ठाकरे सरकारच्या घोटाळ्याविरुद्ध आमचा लढा सुरुच राहणार असंही स्पष्ट केलं.
काय म्हणाले संजय राऊत?
पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
- Sanjay Raut: PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचा किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंध, किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करा: संजय राऊत
- Sanjay Raut PC 10 Points: पीएमसी बँक घोटाळा ते केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप... संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे
- आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!, अमृता फडणवीसांचा राऊतांवर निशाणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha