आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!, अमृता फडणवीसांचा राऊतांवर निशाणा
Maharashtra Shiv Sena Sanjay Raut : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मंगळारी पत्रकार परिषद घेत, भाजप आणि तपास यांत्रणावर टीकेचा बाण सोडला, यावर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
Maharashtra Shiv Sena Sanjay Raut Press Conference : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मंगळारी पत्रकार परिषद घेत, भाजप आणि तपास यांत्रणावर टीकेचा बाण सोडला. यावेळी संजय राऊत यांनी आरोपांची माळ लावली होती, तसेच उद्यापासून साडेतीन लोकं कोण आहेत? हे समजेल, असेही राऊतांनी सांगितले. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है! असे ट्विट करत संजय राऊतांचे नाव न घेता अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला.
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !#Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 15, 2022
भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्य यांच्याविरोधात अपशब्द वापरले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा. ही पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ ड्रामा आहे. सरकारमध्ये स्थान नसल्यानं संजय राऊत विचलित आहेत. संजय राऊत यांची ही पत्रकार परिषद फेल गेली आहे. खोदा पहाड, निकला चुहा, अशी पत्रकार परिषद झाली आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!! चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !! याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!, असे ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 15, 2022
चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !!
याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय
#पत्रकार_परिषद pic.twitter.com/Ruom6vjGdR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 15, 2022
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडचे सरकार पाडण्याचा डाव असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला. तसेच भाजप नेत्यांनी राज्यातील सरकार पाडण्यासाठी दबाव टाकला आणि तपास यंत्रणाच्या धमक्याही दिल्या, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, असा इशारा देत संजय राऊत यांनी तपास यंत्रणा आणि भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच उद्यापासून तुम्हाला अनेक गोष्टी समजतील, असेही सांगितले. शिवसेनामध्ये संजय राऊत एकटे पडले आहेत, अशी टीका विरोधीपक्षांनी केली होती, या टीकेला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. या पत्रकार परिषदेला महापौर किशोरी पेडणेकर, आनंद आढसूळ, अरविंद सावंत,विनायक राऊत,अनिल देसाई,दादा भुसे ,दिवाकर रावते , उदय सामंत , प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे,सचिन अहिर,आदेश बांदेकर, मनीषा कायदे,गजानन कीर्तिकर , संजय शिरसाठ यांच्यासह अनेक शिवसेना खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित होते. त्याशिवाय शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मुंबईसह पुणे, नाशिक, सोलापूर आणि इतर मोठ्या शहरातील शिवसेना कार्यलयाबाहेर शिवसैनिक जमले आहेत. पुणे आणि सोलापूरमध्ये पोस्टरबाजीही पाहायला मिळाली.