मुंबई महापालिकेचा 100 कोटींचा घोटाळा उघड करणार, सोमय्यांचं आव्हान
Kirit Somaiya : कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला आहे. मंगळवारी मुंबई महापालिकेचा 100 कोटींचा घोटाळा उघड करणार आहे
Kirit Somaiya : कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला आहे. मंगळवारी मुंबई महापालिकेचा 100 कोटींचा घोटाळा उघड करणार आहे. त्यापाठोपाठ एम. एम. आर रिजनमधील महापालिकेचे घोटाळे उघड करणार आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. ते डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मेळाव्यानंतर बोलताना किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला आहे, मंत्र्यांचा घोटाळा मी उघडकीस आणला आहे, असं सांगितलं.
अनिल परब कोरोना काळातीव लॉकडाऊनमध्ये दापोली येथे रिसॉर्ट बांधत होते. आता त्यांच्याच एक परिचित व्यक्ती आणि एक अधिकाऱ्याला कशा पद्धतीन कोरोना काळात 100 कोटींचे कोरोना काँट्रॅकक्ट मिळाले हे येत्या मंगळवारी जनतेसमोर ठेवणार आहे. तर पुढच्या महिनाभरात आणखी पाच किस्से बाहेर काढणार आहे. एम एम आर रिजन मधील महापालिकामधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यामधील पार्टनरशिप लोकांसमोर ठेवणार असल्याचेही यावेळी सोमय्या यांनी सांगितलं.
समीर वानखेडेचे जन्मदाखल्याचे गूढ रहस्य मुंबईचे महापौर, नवाब मलिक, आणि मुंबई पालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावे, असे सोमय्या म्हणाले. नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या समीर वानखेडे जन्मदाखल्याचे जन्मदाखल्याचे कोणतेही पुरावे मुंबई महापालिकेकडे नाहीत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यानी महितीच्या अधिकारात दिल्याचे सोमय्या यांनी सांगीतलं. आता लोकांना उत्सुकता आहे की, समीर वानखेडेचे जन्मदाखल्याचे गूढ रहस्य मुंबईचे महापौर, नवाब मलिक, आणि मुंबई पालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावे, असं आवाहन सोमय्या यांनी केलं
हे सरकार कोमात जातंय -
एसटी कर्मचाऱ्याच्या संपाबाबत किरीट सोमय्या याना प्रश्न विचारला असता त्यांनी हे सरकार कोमात जातंय, याची काळजी आहे अशी टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, वीज गायब होतेय, एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, अनिल परब रोज म्हणतात एसटी सुटली, एसटी गावाला निघाली पण एसटी कुठे आहे असा सवाल केला जातोय.
चोरीचा माल परत केला म्हणून गुन्हा माफ होत नाही -
किरीट सोमय्या यांनी आजच्या मेळाव्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर यांच्यासह संजय राऊत यांना देखील लक्ष केलं. यावेळी बोलताना त्यांनी राऊत यांनी ईडीच्या नोटीसा फाडल्या, मात्र त्यानंतर वॉरंट आल्यावर पाठच्या दरवाजाने जाऊन 55 लाख परत केले. चोरीचा माल परत केला, म्हणून गुन्हा माफ होत नाही. मी लढणार आणि कोर्टात जाणार, संजय राऊत याना शिक्षा झाली पाहिजे असं सोमय्या यांनी सांगितलं.