एक्स्प्लोर
भाजपच्या कल्याण शहराध्यक्षांचं तलवारीने केक कटिंग
भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे वाढदिवसाचा केक तलवारीने कापत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कल्याण : भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे वादात अडकण्याची शक्यता आहे. म्हात्रे वाढदिवसाचा केक तलवारीने कापत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रेमनाथ म्हात्रे यांचा एक मे रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त सोमवारी रात्रीच त्यांच्या घराबाहेर वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी म्हात्रे यांनी सुरीऐवजी चक्क तलवारीने केक कापल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. प्रेमनाथ म्हात्रे कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा भागात राहता. हा व्हिडीओ तिथलाच असल्याची माहिती आहे. यावेळी म्हात्रेंच्या आजूबाजूला त्यांचे बॉडीगार्ड, कार्यकर्ते आणि मित्रमंडळी दिसत आहेत. प्रेमनाथ म्हात्रे यांचं नाव यापूर्वी मंचेकर टोळीशीही जोडलं जायचं.
आणखी वाचा























