एक्स्प्लोर
मतदारांना भाजप कार्यकर्त्यांचं पैसेवाटप, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
मुंबई : मुंबईत कफ परेडच्या नेव्हीनगर येथील नोफ्रा भागात मतदारांना पैसे वाटप करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले आहे. काल रात्री प्रभाग क्रमांक 226 मध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
भाजपचे मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 226 मधून निवडणूक लढवत आहेत. पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांकडे त्यांच्या नावाचं प्रचारसाहित्यही सापडलं आहे. प्रत्येक घरात जाऊन हे भाजपचे कार्यकर्ते कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे नोंदवत होते आणि सही घेत होते, कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार कार्यकर्ते पैसे वाटप करत होते, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पैसे वाटप करणाऱ्यांमध्ये भाजपची एक महिला कार्यकर्ता होती, जिच्या पर्समध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा गठ्ठा मिळाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिवसेनेकडून कफ परेड पोलीस स्टेशन तसंच निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement