एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दोन लिजेंडरी एक्स्प्रेसचा बर्थडे, पंजाब मेल आणि डेक्कन क्वीनचा वाढदिवस
1 जून 1912 रोजी पंजाब मेल तेव्हाच्या बॅलार्ड पियर स्टेशनवरुन सुटली होती. तर 1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास सुरु केला.
मुंबई: मुंबईहून सुटणाऱ्या दोन लिजेंडरी एक्स्प्रेसचा आज वाढदिवस. एक पंजाब मेल आणि दुसरी डेक्कन क्वीन. पंजाब मेलला आज 106 वर्षे तर डेक्कन क्वीनला 88 वर्षे पूर्ण झाली.
1 जून 1912 रोजी पंजाब मेल तेव्हाच्या बॅलार्ड पियर स्टेशनवरुन सुटली होती. तर 1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास सुरु केला.
या दोन्ही ट्रेन तेव्हाच्या ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेने सुरु केल्या होत्या. आता आपण तिला मध्य रेल्वे म्हणून ओळखतो.
पंजाब मेल
पंजाब मेल तेव्हा मुंबई ते थेट आताच्या पकिस्तानतील पेशावर या शहरापर्यंत धावायची. एकूण 2496 किमीचे अंतर ती 47 तासात पूर्ण करायची. त्यावेळी या गाडीला केवल 6 डबे होते. त्यातील तीनच डबे हे प्रवशांसाठी होते, ज्यात केवळ 96 प्रवासी असायचे.
उर्वरित डबे टपाल आणि मालवाहतूक करायचे. आता हीच गाडी 1930 किमीचा प्रवास 34 तासात करते आणि मुंबई ते फिरोजपूर अशी धावते.
डेक्कन क्वीन
डेक्कन क्वीनचा इतिहासदेखील मोठा आहे. डेक्कन क्वीन ही पहिली सुपरफास्ट डिलक्स ट्रेन म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला तिला केवळ 7 डबे होते. नंतर ते 12 करण्यात आले आणि आता 17 डबे घेऊन ही गाडी धावते.
या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे, जिला डायनिंग कार आहे. म्हणजेच चालत्या गाडीत हॉटेल सारखे बसून खण्याची सोय आहे.
पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारी ही गाडी दोन्ही शाहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. कित्येक वर्षे डेक्कन क्वीनने दररोज पुणे- मुंबई- पुणे प्रवास करणारे प्रवासी आहेत.
येत्या काळात याच गाडीला प्रोजेक्ट उत्कृष्टच्या माध्यमातून नवीन सुविधा देण्यात येणार आहेत. अशा या दोन्ही लेजेंडरी गाड्या भारताच्या रेल्वे इतिहासातील मानबिंदू आहेत.
मुख्य म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकसाला, सांस्कृतिक जडणघडणीला कारणीभूत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि रेल्वेप्रेमीदेखील मोठ्या उत्साहात या दोन्ही गड्यांचे वाढदिवस साजरे करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement