एक्स्प्लोर
कंटेनरच्या चाकाखाली येऊन बाईक रायडरचा जागीच मृत्यू
वरुण हा एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून जॉईन होणार होता. त्यासंदर्भातील त्याचं प्रशिक्षणही पूर्ण झालं होतं.

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातात बाईक रायडरचा जागच्या जागीच मृत्यू झाला. वरुण बामरोटिया असे 28 वर्षीय बाईक रायडरचं नाव आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर वसई फाट्याजवळ कंटेनरच्या चाकांखाली वरुण बामरोटियाची बाईक आली आणि वरुणचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
वरुण बामरोटिया हा ठाण्यातील रहिवाशी असून, BMW GS बाईकवरुन तो प्रवास करत होता. भरधाव कंटेनरखाली आल्याने त्याची जीवनयात्रा संपली. वरुण हा एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून जॉईन होणार होता. त्यासंदर्भातील त्याचं प्रशिक्षणही पूर्ण झालं होतं.
वरुण बामरोटिया हा ठाण्यातील रहिवाशी असून, BMW GS बाईकवरुन तो प्रवास करत होता. भरधाव कंटेनरखाली आल्याने त्याची जीवनयात्रा संपली. वरुण हा एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून जॉईन होणार होता. त्यासंदर्भातील त्याचं प्रशिक्षणही पूर्ण झालं होतं. आणखी वाचा























