एक्स्प्लोर
उल्हासनगरमध्ये मिळतेय अवघ्या 10 रुपयात साडी, खरेदीसाठी महिलांची तोबा गर्दी
10 रुपयांची साडी खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दुकानासमोर पाहायला मिळते आहे.
कल्याण : साड्या म्हणजे महिलावर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय. या साड्यांचा कुठे सेल लागला असेल, तर तिथे गर्दी झालीच म्हणून समजा. असाच एक सेल सध्या उल्हासनगरमध्ये लागला आहे. या सेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अवघ्या 10 रुपयात साडी मिळते आहे. त्यामुळे महिलांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे.
उल्हासनगरमध्ये सध्या साड्यांचा एक आगळावेगळा सेल लागला आहे. या सेलमध्ये फक्त 10 रुपयात साड्या विकल्या जात आहेत. उल्हासनगरच्या गजानन मार्केट परिसरात असलेल्या रंग क्रिएशन या साड्यांच्या दुकानात हा सेल लागला आहे. हा सेल संपूर्ण पावसाळा सुरु राहणार आहे. या दुकानात सकाळी सकाळी 10 ते दुपारी 12 या दोन तासात फक्त 10 रुपयात साड्या मिळणार आहेत. या साड्या खरेदी करण्यासाठी महिला तोबा गर्दी करत आहेत. अगदी सकाळी 8 वाजल्यापासून दुकानाच्या बाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहेत.
या दुकानात 10 रुपयांच्या साड्यांव्यतिरिक्त अन्यही साड्या विक्रीसाठी आहेत. मात्र आपण वर्षभर ज्या ग्राहकांकडून कमावतो, त्यांना वर्षातून काही दिवस आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि त्यातुन गोरगरिबांचा फायदा झाला पाहिजे. या हेतूने हा सेल सुरू करण्यात आल्याचं दुकानमालकाचं म्हणणं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला येत असल्या तरी दुकानातले कामगारही न कंटाळता त्यांना साड्या दाखवतात.
दहा रुपयात हल्ली मुंबईत वडापावही मिळत नाही. अशा महागाईच्या काळात असा एखादा अवलिया 10 रुपयात साड्या विकत असेल, तर अर्थातच त्याची चर्चा तर होणारच!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement