एक्स्प्लोर
मुंबईत कांजूरमार्गमध्ये स्टुडिओला भीषण आग
कांजूरमार्गमध्ये गांधी नगर परिसरात एका स्टुडिओला मोठी आग लागली आहे. सिने विस्ता असं स्टुडिओचं नाव असून अग्नीशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबई : कांजूरमार्गमध्ये गांधी नगर परिसरात एका स्टुडिओला मोठी आग लागली आहे. सिने विस्ता असं स्टुडिओचं नाव असून अग्नीशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कांजूरमार्गमधील पवई टेलिफोनसमोर हा सिनेविस्टा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत प्रामुख्याने हिंदी मालिकांचे शूटिंग चालतं. तसंच जुन्या थीमचा सेटही या स्टुडिओत उभारण्यात आला होता. या स्टुडिओत कुणी अडकलं आहे का? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान अग्नीशमन दलाने 2 नंबरचा कॉल दिल्याने आग विझवण्यासाठी 10 ते 12 गाड्या आग विझवण्यासाठी दाखल होणार आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र























