विमा योजनेत आकर्षक गुंतवणुकीचे आमिष दाखवत भिवंडीतील व्यावसायिकाला दीड कोटींना चुना
Bhiwandi News Update : विमा योजनेत आकर्षक गुंतवणुकीचे आमिष दाखवत भिवंडीतील एका व्यवसायिकाला तब्बल दीड कोटींना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
![विमा योजनेत आकर्षक गुंतवणुकीचे आमिष दाखवत भिवंडीतील व्यावसायिकाला दीड कोटींना चुना Bhiwandi crime News Update businessman gets Rs 1.5 crore Froud in insurance scheme विमा योजनेत आकर्षक गुंतवणुकीचे आमिष दाखवत भिवंडीतील व्यावसायिकाला दीड कोटींना चुना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/21/e67e27af0c8bfa349ba4edbc5e255f23_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhiwandi News Update : विमा योजनेत आकर्षक गुंतवणुकीचे आमिष दाखवत भिवंडीतील एका व्यवसायिकाला तब्बल दीड कोटींना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारी बँकेचा व्यवस्थापक आणि विमा अधिकाऱ्यांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पुढील तपास सुरू आहे. भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने 2012 मध्ये बँकेतून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी त्यांची ओळख बँकेच्या व्यवस्थापकासोबत झाली होती. व्यवस्थापकाने त्याची पत्नी विमा कंपनीत काम करत असल्याचे सांगून एका योजनेत गुंतवणूक केल्यास नऊ वर्षांनी दुप्पट परतावा मिळेल असे या व्यावसायिकास सांगितले.
त्यामुळे व्यवसायिकाने त्याच्या पत्नीच्या नावाने 99 लाख 99 हजार 778 रुपये या विमा योजनेत गुंतविले. या योजनेतील काही कागदपत्रे व्यवस्थापकाने व्यावसायिकाला दिली नव्हती. काही वर्षांनी या कागदपत्रांची मागणी त्याने विमा कार्यालयात केली असता, त्यांच्या पत्नीच्या नावाने काहीजणांनी बनावट स्वाक्षऱ्या करून कर्ज मंजूर करुन घेतल्याचे त्यांना आढळून आले.
हे समजताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तात्काळ भिवंडी पोलीसात धाव घेत 99 लाख 99 हजार 778 रुपये आणि त्याचा परतावा असे एकूण 1 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँक अधिकारी आणि विमा क्षेत्रातील अधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- 'फटे' नंतर आता 'कट्टे' घोटाळा ; पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने पंढरपुरात अनेकांची फसवणूक
- Barshi Phate Scam: फटे घोटाळ्यात मोठा गौप्यस्फोट, गुंतवणुकदारांकडून घेतलेले पैसे...
- Barshi Scam : बार्शीच्या फटे स्कॅममधील मुख्य आरोपी विशाल फटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- 'भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन, मी एका दिवसात 4 लाखाचे 54 लाख केलेला माणूस'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)