एक्स्प्लोर
भैय्यूजी महाराजांच्या ताफ्याने कुर्ल्यात व्यक्तीला उडवलं?
मनोज गडकरी हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज यांच्या ताफ्याने मुंबईतील कुर्ल्यात एका व्यक्तीला उडवल्याचा आरोप करण्यात येत आहे. फुल व्यावसायिक मनोज गडकरी हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कुर्ल्यातील नेहरुनगरमधून भैय्यूजी महाराज यांचा ताफा जात असताना ही घटना घडली, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
भैय्यूजी महाराज कुर्ल्यातील केदारनाथ मंदिरातील कार्यक्रम आटोपून परतत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील भरधाव वेगाने जाणाऱ्या एका गाडीचा धक्का रस्ता ओलांडत असलेल्या मनोज गडकरी यांना लागला.
या अपघातात मनोज गडकरी हे गंभीर जखमी झाले. मात्र, त्या अज्ञात मोटार चालकाने गाडी न थांबवता, कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता गाडी तशीच पुढे नेली.
अज्ञात चालकाविरोधात कुर्ल्यातील नेहरुनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 279, 998 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती गाडी भैय्यूजी महाराजांच्या ताफ्यातलीच होती, की इतर कुठल्या गाडीचा या व्यक्तीला धक्का लागला, याची खात्री पोलीस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
नाशिक
क्राईम
Advertisement