एक्स्प्लोर
Advertisement
दिवाळी संपली, बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस कागदावरच
कर्मचाऱ्यांचा बोनस केवळ कागदावरच असून पैसे नसतांना बेस्ट प्रशासनानं केलेली ही घोषणा हवेतच विरली आहे. प्रशासकीय तरतूद न झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना जाहिर झालेला 5,500 रुपयांचा बोनस अद्याप देऊ शकत नसल्याची कबुली बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
मुंबई : बेस्टच्या 5500 रूपये दिवाळी बोनस म्हणून जाहिर केला होता. मात्र दिवाळी संपली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांचा बोनस केवळ कागदावरच असून पैसे नसतांना बेस्ट प्रशासनानं केलेली ही घोषणा हवेतच विरली आहे. प्रशासकीय तरतूद न झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना जाहिर झालेला 5,500 रुपयांचा बोनस अद्याप देऊ शकत नसल्याची कबुली बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
पैसे नसतांना बेस्ट प्रशासनानं हवेतच बोनसची घोषणा केली. दिवाळीपूर्वी बेस्ट प्रशासनानं 5,500 रुपयांचा बोनस जाहिर केला होता. बेस्ट आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे. 40 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसपोटी 22 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, बेस्टकडे पैसे नसतांनाच कर्मचाऱ्यांच्या बोनसची घोषणा करण्याची घाई बेस्ट प्रशासनाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळाल्यानं त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली. मात्र, दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहूनही बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालाच नाही.
बेस्टच्या एकूण 40 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचा लाभ होणार असल्याची माहिती महाव्यवस्थापकांनी बेस्ट समितीत दिली होती. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याच्या संदर्भात बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्त यांच्यात वाटाघाटी झाल्या. या वाटाघाटीनंतर अखेर बोनस जाहीर करण्यात आला. मागील काही महिन्यापासून बेस्टची आर्थिक स्थिती ढासळली होती. यामुळे बोनस मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मागील वर्षी बोनस दिल्यानंतर पगारातून वळता करून घेण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement