एक्स्प्लोर

राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी, 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

राज ठाकरे यांनी 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता.

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता.

याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून आता वॉरंट जारी करण्यात आलं आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यादिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे यांनी टोलनाक्या वरून केलेल्या भडकावू भाषणानंतर नवी मुंबईतील मनसेकडून वाशी टोलनाका फोडण्यात आला होता. 2014 साली फोडलेल्या टोलनाक्यामुळे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र याबाबत अनेक वेळा राज ठाकरे यांना पोलिसांनी समन्स देऊनही ते कोर्टात हजर न राहिल्याने अखेर कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले आहे.

26 जानेवारी 2014 रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात टोलनाक्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. टोलनाक्यावरून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा टाकला जात असून यांना अद्दल घटवा असे विधान केले होते. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुढील काही वेळातच वाशी खाडी पुलावरील टोलनाक्यावर नवी मुंबईतील मनसेने कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळेसह एकूण 7 जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर मनसेच्या इतर कार्यकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली असली तरी राज ठाकरे यांनी मात्र पोलिसांच्या नोटीसींना उत्तरे दिली नव्हती. वाशी पोलिसांकडून अनेक वेळा राज ठाकरे यांना समन्स धाडूनही ते न्यायालयासमोर हजर झाले नव्हते. ही बाब पोलिसांनी वाशी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर अखेर त्यांच्या विरोधात कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने राज ठाकरे यांना दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: 'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Embed widget