Ganesh Utsav 2022 : पीओपींच्या मूर्तीबाबत विविध पर्यायांवर चर्चा, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेसोबत बैठक
मुंबईतील सगळ्यात मोठा सण म्हणदे गणेशोत्सव. अगदी धुमधडाक्यात पार पडणाऱ्या या उत्सवासाठी सार्वजनिक मंडळं बऱ्याच महिन्यांच्या आधीपासून कामाला लागतात.
मुंबई : सर्व मुंबईकरांचा आवडीचा सण असणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी अनेक महिन्यांच्या आधीपासून सुरु होते. पण मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावर काही निर्बंध आले आहेत. त्यात मागील बरीच वर्ष प्लास्टर ऑफ पॅरीस अर्थात पीओपी मूर्त्यांमुळेही बरेच वाद होत असून शासनाने कडक निर्बंध तयार केले आहेत. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी नुकतीच पीओपी मूर्तीच्या बंदीबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तिकार संघटना ,महापौर आणि मुंबई महापालिका आयुक्त यांची बैठक पार पडली.
या बैठकीत पीओपी मूर्तीबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या गाईडलाईन दिल्या आहेत. त्या गाईडलाईन्सवर चर्चा झाली. दरम्यान बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि मूर्तिकारांनी पीओपी मूर्तीच्या संदर्भात काही पर्याय समोर ठेवले आहेत. पीओपीमधील जे घटक पर्यावरणाला हानिकारक आहेत ज्याने प्रदूषण होऊ शकते, असे घटक बाजूला करून पीओपी मूर्ती तयार करता येऊ शकते का? याबाबत सेंट्रल सायंटिफिक कमिटीकडे विचारणा करावी. जेणेकरून पीओपी मूर्ती सुद्धा साकारल्या जातील आणि प्रदूषण सुद्धा होणार नाही, असा मुद्दा गणेशोत्सव समन्वय समितीकडून मांडण्यात आला. शिवाय, मूर्तीला रंग देताना हर्बल कलर चा वापर केलं प्रदूषण होणार नाही याची सुद्धा काळजी मूर्तिकार घेतील. असंही यावेळी सांगण्यात आलं. शिवाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या गाईडलाईन्स 2020 मध्ये दिल्या त्यामध्ये काही संभ्रम असून ते संभ्रम दूर करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाशी प्रशासनाने चर्चा करावी असंही यावेळी सांगण्यात आलं.
हे ही वाचा-
- मुंबईने तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला, टास्क फोर्स तज्ज्ञांचे अनुमान; सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत घट
- Mumbai: मुंबईतील आरे परिसरात विकासाची कामे लवकरच पूर्ण होणार
- राणीबागेतील कामांच्या कंत्राटाबाबत मंत्री अस्लम शेख यांचा दुसऱ्यांदा आक्षेप, म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha