एक्स्प्लोर

Badlapur Crime: 'लाडकी बहीण योजना,1500 रूपये नको, त्यापेक्षा..', बदलापूरातील लैंगिक अत्याचार प्रकरणी महिलांचा रोष

Badlapur Crime News: आंदोलनातील काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित ( Badlapur Crime ) नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

Badlapur Crime: बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या घटनेनंतर सध्या बदलापूरमध्ये पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने नागरिक आणि पालक चांगलेच संतापले आहेत. आज(मंगळवारी) सकाळी संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला. तर दुसरीकडे संतापलेल्या पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. दरम्यान या संतप्त पालकांनी हातात पोस्टर घेऊन 'आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको. आमच्या मुलीच सुरक्षित ( Badlapur Crime News) नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला आहे.

आंदोलनातील काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित ( Badlapur Crime ) नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Crime ) झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.आता या घटनेचे पडसाद बदलापुरमध्ये उमटताना दिसत आहेत. बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे. त्याचप्रमाणे बदलापूरमधील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशी द्या अशी मागणी होते आहे. यावेळी महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

नेमकं काय घडलं? 

बदलापूर पूर्वमध्ये एका नामांकित शाळेत शिकत असलेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. 

यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली. आरोपी 24 वर्षांचा असून या शाळेतील सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता.

 लोक रूळावर बसल्याने रेल्वे सेवा ठप्प

संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले. डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेस या सर्व संतप्त आंदोलकांनी रोखून धरली.साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. आंदोलक रेल्वे रुळावर बसल्याने रेल्वे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी केली.

रेल्वे रूळावर आणि रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे अप मार्गावरील रेल्वे वाहतूक वांगणी स्थानकापर्यंत थांबवण्यात आली आहे. तर डाऊन दिशेकडील रेल्वे सेवा अंबरनाथ स्थानकात थांबवण्यात आली आहे.  संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले. डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेस या सर्व संतप्त आंदोलकांनी रोखून धरली. बदलापूर येथील रेल रोकोमुळे आता पर्यंत 10 एक्सप्रेस दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, कर्जत, पनवेल, ठाणे या मार्गाने एक्सप्रेस चालवल्या जात आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget