एक्स्प्लोर
राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पहिल्याच पिल्लाचा सातव्या दिवशी मृत्यू
राणीच्या बागेतील हॅम्बोल्ट पेंग्विनच्या नवजात पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी या पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 15 ऑगस्ट रोजी जन्मलेलं पिल्लू केवळ सात दिवसच जिवंत राहिलं.

मुंबई | राणीच्या बागेतील हॅम्बोल्ट पेंग्विनच्या नवजात पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी या पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 15 ऑगस्ट रोजी जन्मलेलं पिल्लू केवळ सात दिवसच जिवंत राहिलं. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत 15 ऑगस्ट रोजी भारतातील पहिलंच पेंग्विनचं पिल्लू जन्माला आलं होतं. फ्लिपर आणि मोल्ट या पेंग्विनच्या जोडीला हे पिल्लू झालं होतं. 22 ऑगस्टला मृत्यू झालेलं पेंग्विनचं पिल्लू केवळ 7 दिवसच जीवंत राहिलं आहे. गुरुवारी 23 ऑगस्टला या पिल्लाचं शवविच्छेदन कऱण्यात आलं. नवजात पिल्लातील विसंगतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच अंड्यातील पिवळा बलक वापरला न जाता तसाच राहणे आणि यकृतामधील बिघाड यामुळे पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. संबंधित बातम्या राणीच्या बागेतील पेंग्विनकडे गुड न्यूज राणीच्या बागेत पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म राणीच्या बागेत नव्या पाहुण्याचं आगमन पेंग्विनच्या पिल्लाचा पायगुण, राणीच्या बागेच्या विकासाचा मार्ग मोकळा
आणखी वाचा























