एक्स्प्लोर
Advertisement
दिलासादायक... मुंबईचा रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी 16 दिवसांवर
मुंबईत कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 13 वरुन आता 16 दिवस इतका झाला आहे. म्हणजेच रुग्ण वाढण्याचा वेग मंदावतो आहे. रुग्ण दुपटीच्या सरासरी 16 दिवसांच्या तुलनेत काही विभागांनी त्याहून जास्त चांगली कामगिरी केली आहे.
मुंबई: महानगरपालिकेच्या 6 विभागांमध्ये कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 20 दिवसांवर गेला आहे. तर पूर्ण मुंबईचा रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी (डबलींग रेट) 13 वरुन आता 16 दिवसांवर गेला आहे. तसंच मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील (रिकव्हरी रेट) 43 टक्के इतका झाला आहे.
विशेष म्हणजे महापालिकेच्या 24 पैकी 6 विभागांमध्ये तर कोविड रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 20 दिवस इतके असून त्यात पूर्वी हॉटस्पॉट म्हणून ओळख बनलेल्या जी/दक्षिण (वरळीचा समावेश) जी/उत्तर(धारावीचा समावेश) एम/पूर्व विभाग (मानखूर्द) यांचाही समावेश आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध कोरोना समर्पित रुग्णालये, आरोग्य केंद्र आदी मिळून आजपर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे 43 टक्के रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यासमवेत मुंबईत बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 13 वरुन आता 16 दिवस इतका झाला आहे.
म्हणजेच रुग्ण वाढण्याचा वेग मंदावतो आहे. रुग्ण दुपटीच्या सरासरी 16 दिवसांच्या तुलनेत काही विभागांनी त्याहून जास्त चांगली कामगिरी केली आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट मंदावला
यामध्ये ई (भायखळा परिसर) एफ/उत्तर, ( सायन , माटुंगा,वडाळा) जी/दक्षिण (वरळीचा समावेश), जी/उत्तर ( धारावीचा समावेश), एच/पूर्व ( वांद्रे पूर्व, सांताक्रुझ- मातोश्रीचा समावेश), एम/पूर्व (मानखूर्द) या विभागांची ही सरासरी 20 दिवस आहे.
Coronavirus | कोरोना चाचणीबाबत मुंबई महापालिका आयुक्तांचे नवे निर्देश
तर डी विभाग (नाना चौक ते मलबार हिल) 19 दिवस, ए विभाग (कुलाबा समावेश), एल विभाग (कुर्ला समावेश) 17 दिवस,के/पश्चिम (अंधेरी समावेश) विभाग 18 दिवस, बी विभाग (मशिदमंदीर परिसर) 16 दिवस याप्रमाणे विविध विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे.
मुंबईतील कोरोना मृत्यूदर देखील यापूर्वीच नियंत्रणात आला आहे. सध्या तो 3.2 टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
नागपूर
Advertisement