एक्स्प्लोर
ठाण्यात रिक्षाचालकाचा TMT चालकावर हल्ला
रिक्षाचालकाने रस्त्यावरच्या पेव्हरब्लॉकने टीएमटी बसची काचही फोडली.

ठाणे : ठाण्यात रिक्षावाल्याची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. ओव्हरटेक करु दिले नाही म्हणून रिक्षाचालकाने टीएमटी बसच्या चालकावर हल्ला केला. रिक्षाचालक फरार झाला आहे. काल (29 ऑक्टोबर) संध्याकाळी ही घटना घडली.
ठाणे स्टेशन ते लोधा कॉम्प्लेक्सपर्यंत जाणारी ही बस होती.
ठाण्यातील परम हॉस्पिटलजवळ टीएमटी बस चालकाने ओव्हरटेक करु दिले नाही म्हणून रिक्षाचालकाने हल्ला केला. शिवाय रस्त्यावरच्या पेव्हरब्लॉकने टीएमटी बसची काचही फोडली.
राबोडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 336, 337, 504, 427 या कलमाअंतर्गत आणि सार्वजनिक मालमत्तेस हानी पोहोचवणे हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेत एक प्रवासीही जखमी झाला आहे.
ठाण्यात याआधीही रिक्षाचालकांच्या मुजोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम लावणार का, असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांकडून उपस्थित केला जातो आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























