एक्स्प्लोर
कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, 10 ते 15जण जखमी
कल्याण: कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळल्याची घटना काल रात्री कल्याणमध्ये घडली. कल्याण काटेमानिवली इथं गावदेवी मित्र मंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
कबड्डी स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी खचाखच भरलेल्या प्रेक्षक गॅलरीत काही जण उभे राहून नाचत होते. हा भार सहन न झाल्यानं प्रेक्षक गैलरी अचानक कोसळली. त्यामुळे 10 ते 15 प्रेक्षक किरकोळ जखमी झाले. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. सुदैवानं इथं कुणालाही गंभीर इजा झाली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच प्रकार महाडमध्येही घडला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच प्रकार रोह्यातही घडला होता. त्यावेळी 25 ते 30 प्रेक्षक जखमी झाले होते. प्रेक्षकांच्या अतिउत्साहीपणामुळे असे प्रकार घडत असल्याचं वारंवार समोर येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
विश्व
विश्व
Advertisement