मुंबईकरांनो लक्ष द्या! धारावीतील आगीमुळे वाहतुकीत मोठे बदल, मुंबई ट्रॅफिक पोलिसांचं ट्वीट
Fire in Mumbai Dharavi: मुंबईच्या कमला नगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग. आगीत 25 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक. तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण. वाहतुकीतही मोठे बदल.
Traffic Changes Due to Fire in Dharavi: मुंबईत (Mumbai News) धारावी (Dharavi) परिसरातील कमला नगरच्या झोपडपट्टीला भीषण आग (Mumbai Fire Updates) लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सध्या आग विझली असून घटनास्थळी फायर कुलिंगचं काम सुरू आहे. अशातच या आगीमुळे वाहुतीक बदल करण्यात आले आहेत.
मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये धारावी परिसरातील आगीमुळे वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "धारावी कमला नगर येथील आगीमुळे 90 फीट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीनं रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून 60 फीट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे."
मुंबईतील 90 फीट रोडवरुन आणि 60 फीट रोडवरुन अनेक मुंबईकर आपल्या कार्यालयात पोहोचण्यासाठी प्रवास करतात. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे कार्यालय असणारे, तसेच ईस्टर्न एक्सप्रेसवेवरुन अनेकजण पश्चिम उपनगरांच्या दिशेनं प्रवास करतात. त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हीही या मार्गांवरुन प्रवास करणार असाल तर, तुमच्या प्रवासाचं नियोजन आधीच करा.
Due to the fire at Dharavi Kamla Nagar, 90 feet road has been closed and the traffic has been diverted to Santh Rohidas Marg.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 22, 2023
Instead of going to 60 feet road from T junction, the traffic has been diverted to Raheja Mahim. #MTPTrafficUpdates
मुंबईच्या धारावीत भीषण आग
मुंबईच्या (Mumbai News) शाहूनगर परिसरात (Shahunagar) असलेला कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये (Kamala Nagar Slum) पहाटे भीषण आग (Mumbai Fire) लागली होती. या आगीमध्ये 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या फायर कुलिंगचं काम सुरू आहे.
मुंबईतील (Mumbai Fire Update) धारावी (Dharavi) परिसरात असलेल्या कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये पहाटे 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल तीन तास ही आग धुमसतच होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दाटीवाटीचा परिसर आणि अरुंद रस्ते यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :