एक्स्प्लोर

आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

कोरोना संकटकाळात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांपैकी आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर 1302 डॉक्टर्स कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांची संघटना आयएमएकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : कोरोना संकटकाळात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांपैकी आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. तर आतापर्यंत 1302 डॉक्टरांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा डॉक्टरांचा मृत्युदर जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

कोरोना विषाणू संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सरकार, प्रशासन, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी असे सर्वजण अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, या कोरोना विषाणू सोबतच्या युद्धात आघाडीवर लढत आहेत ते म्हणजे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी. याचा फटकाही त्यांना अधिक बसत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या संदर्भात संघटनेच्या सर्व सदस्यांना आता रेड अलर्ट जारी केला आहे.

कोरोनाच्या संकटात अनेक डॉक्टरांचा मृत्यू सरकारने अद्याप किती डॉक्टरांचे मृत्यू झाले हे जाहीर केले नाही. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी आहे. याचसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांकडून वैयक्तीक फॉर्म भरुन घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संघटनेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर 1302 डॉक्टरांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. 99 पैकी 73 डॉक्टरांचं वय हे 50 च्या पुढील आहे. तर 19 डॉक्टर हे 35 ते 50 वयोगटातील आहे. 1302 संक्रमित डॉक्टरांपैकी 586 डॉक्टर्स हे प्रॅक्टीसिंग आहे तर 566 डॉक्टर्स हे निवासी आहेत. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांचा मृत्युदर हा 8 ते 9 टक्के असल्याची माहिती माहिती डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी एबीपी ऑनलाईनशी बोलताना दिली.

RIL AGM 2020 | कोरोना टेस्टिंगच्या दिशेने रिलायन्स फाऊंडेशन वेगाने काम करतंय : नीता अंबानी

पीपीई किट दर्जेदार नाहीत सरकारी डॉक्टरांप्रमाणे खासगी डॉक्टरही कोरोना काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांना सेवा देत आहे. मात्र, डॉक्टरांना मिळणारे पीपीई किट दर्जेदार नसल्याने त्यांना कोरोना विषाणूची बाधा होत आहे. डॉ. उत्तुरे म्हणाले, की यावर सरकारचं कुठलही कंट्रोल नाही. कोरोना काळात पीपीई किटची निर्मिती कुणीही करत आहे. त्यामुळे त्यांच्या दर्जाबद्दल शंका आहे. यासाठी सरकारकडून कोणत्याही गाईडलाईन्स नाहीत. त्यामुळे एकप्रकारे डॉक्टरांच्या जीवाशी खेळ केल्यासारखेचं आहे. त्यामुळे सरकारने यासाठी अधिकृत नियमावली करण्याची मागणीही संघटनेने केली असल्याची माहिती डॉ. उत्तुरे यांनी दिली. डॉक्टरांच्या मृत्युंमध्ये फॅमिली डॉक्टर्सचा जास्त समावेश असल्याचंही पुढं आलं आहे.

डॉक्टरांसाठी रेड अलर्ट कोरोना काळात झालेल्या डॉक्टरांची मृत्यूची गंभीर दखल इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतली आहे. त्याचसाठी संघटनेच्या सर्व डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकाला काही उपाययोजना सांगितल्या आहेत. सोबतचं सर्व डॉक्टरांना सुरक्षेच्या दृष्टीने माहिती पुरवण्याचं काम सुरू केलं आहे. सर्व डॉक्टरांनी काळजी घेण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत.

Top 100 News | देशात 29 हजार 429 नव्या रुग्णांची भर | महत्त्वाच्या 100 बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget