व्यापार्यावर प्राणघातक हल्ला आणि खंडणी प्रकरण, भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक असणाऱ्या सचिन खेमा यांना व्यापाऱ्यावर खंडणीसाठी प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
कल्याण : कल्याणमधील (Kalyan) व्यापारी अमजद सय्यद याच्यावर 5 जानेवारी रोजी पहाटे काही जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सय्यद हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्ल्यात भाजप (BJP) नगरसेवक सचिन खेमा याचा भाऊ नितीन खेमा, बबलू मजिद, प्रेम चौधरी आणि सतीश पोकळ हे चौघे सहभागी होते. सचिन खेमा यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील करत असून त्यांनी सचिन यांना अटक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सचिन यांनी किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण केली होती. या तरुणाला अमजद याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास मदत केली. याचाच राग मनात धरून अमजद याच्यावर हा हल्ला करण्यात आला. इतकेच नव्हे तर अमजदकडून पैसे देखील मागण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस अधिक तपास करत आहेत. याआधी सतीश पोकळ याला आधी अटक करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सायंकाळी सचिन खेमा यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर फरार आरोपींचा सध्या पोलिस घेत आहेत. या प्रकरणामुळे केडीएमसीच्या (KDMC) राजकीय वर्तुळात ही चर्चा होत आहे.
हे ही वाचा:
- Maharashtra School : राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
- अमरावती, दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरुन राजकारण तापलं! नेमकं घडलंय तरी काय?
- आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत निर्णय घ्या, उमेदवारांची मागणी, तर पूर्ण परीक्षा रद्द करण्यासाठी एमपीएससी समन्वय समितीची विशेष मोहीम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha