एक्स्प्लोर
...तर आम्ही शिवसेनेसोबत जाहीरनामा प्रसिद्ध करु: आशिष शेलार
मुंबई: 'युती व्हावी ही आमची भूमिका आहे. त्यामुले शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर वक्तव्य करणार नाही. जर युती झाली आम्ही आमचा जाहीरनामा एकत्र प्रसिद्ध करु.' असं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज स्पष्ट केलं.
'भाजपचाही जाहीरनामा तयार आहे. लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. पण तोवर जर युती झाली तर आम्ही मित्रपक्षाच्यासोबत आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करु.' असं आशिष शेलार म्हणाले. 'युती व्हावी अशी आमची भूमिका आहे. पण युती पारदर्शक कारभारावर व्हावी तसेच आकड्यांपेक्षा अजेंडा महत्वाचा आहे.' असंही शेलार यांनी ठणकावून सांगितलं.
दरम्यान, युतीबाबात बोलताना शेलार म्हणाले की, '114 जागांचा प्रस्ताव तर्क आणि आधारावर दिला. शिवसेनेकडून 60 जागांचा प्रस्ताव आला. हे आकडे पाहून चर्चा करण्यात काहीही तथ्य नाही. असं आमच्या नेत्यांचं म्हणणं ठरलं. त्यामुळे आता युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.' असंही शेलार यांनी स्पष्ट केलं.
मनसेचे विक्रोळीचे माजी आमदार मंगेश सांगळे आणि काँग्रेसचे विलेपार्लेचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आज आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सांगळे यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement