एक्स्प्लोर
भविष्यात सेनेला डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल : आशिष शेलार
'दुसऱ्याच्या घरी पोरगं झालं तरी हे आनंद साजरा करतात. ज्या काँग्रेसला मतं मिळाली की ज्यांना आनंद होतो त्यांचा अंत काँग्रेसच्याच रस्त्यावर होईल.’
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणूक निकालानंतर इकडे महाराष्ट्रात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे. यावेळी विजयाचं सेलिब्रेशन म्हणून भाजपनं 'सामना' पथकाचे ढोल वाजवून जल्लोष केला. ‘भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशीन घ्यावं लागेल.’, असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.
आशिष शेलारांची शिवसेनेवर जोरदार टीका
‘जल्लोषात साजरा करण्यासाठी जे ढोल बडवले जात आहेत ते आम्ही मुद्दामच ‘सामना’ ढोल पथकाचे मागवले. गुजरातमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल. दुसऱ्याच्या घरी पोरगं झालं तरी हे आनंद साजरा करतात. ज्या काँग्रेसला मतं मिळाली की ज्यांना आनंद होतो त्यांचा अंत काँग्रेसच्याच रस्त्यावर होईल.’ अशी घणाघाती टीका शेलारांनी केली आहे.
निवडणुकीदरम्यान EVM, जीएसटीची अंमलबजावणी, नोटाबंदी अशा मुद्दयांवरुन शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल केला होता. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाची स्तुतीदेखील केली होती. त्या सर्व मुद्द्यांवरुन आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केली आहे. दुसरीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गुजरात निकालानंतर किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका 'गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार , जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना...' अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपासून किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर प्रचंड टीका केली आहे. आता गुजरात निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी शिवसेनेलाच टार्गेट केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या : गुजरात निकालानंतर किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका LIVE हिमाचल प्रदेश निवडणूक 2017 निकाल: भाजप बहुमताकडे गुजरातचा रणसंग्राम : निकालाचा क्षणाक्षणाचा थरार कसा पाहाल? सौराष्ट्र कच्छ निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE उत्तर गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE दक्षिण गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE मध्य गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATEअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement