एक्स्प्लोर
जनताच शिवसेनेला काळ्या पाण्याची शिक्षा देईल: आशिष शेलार
ठाणे: 'काळ्या पैशाबाबत शिवसेनेनं दुतोंडी भूमिका घेऊ नये. हिंमत असेल तर थेट टोकाची भूमिका घेऊन दाखवा.' असा हल्लाबोल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला आहे. ते आज ठाण्यात बोलत होते.
'शिवसेनेची काळ्या पैशाबाबत दुतोंडी भूमिका आहे. फक्त इशारे देऊ नका, हिंमत असेल तर थेट भूमिका घ्या. शिवसेना जर काळ्या पैशाच्या सोबत असेल तर जनता शिवसेनेला काळ्या पाण्याची शिक्षा देईल.' असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरुन मोदींना फटकारलं होतं. 'देशातील जनतेच्या डोळ्यात अश्रू येत असताना तुम्ही भावूक होण्यात अर्थ नाही. केंद्रातलं सरकार जनतेला आपलं वाटत नाही. शेतकऱ्यांना आज पेरणीसाठीही पैसा मिळत नाही. गोरगरीब शेतकऱ्यांकडेही काळा पैसा आहे, असं मोदींना वाटतं का?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement