एक्स्प्लोर
मुजोर टॅक्सीचालकाला मनसे कार्यकर्त्यांचा चोप, व्हिडीओ व्हायरल
महिला प्रवाशाशी हुज्जत घालून तिच्यावर दादागिरी करणाऱ्या एका मुजोर टॅक्सी चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोपले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबई : विरारमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या एका इस्टेट एजंटला मनसे नेत्यांनी चोपल्याची घटना ताजी असताना आता अजून एक घटना समोर आली आहे. एका मुजोर टॅक्सी चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. मनसे युवाशाखा उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी एका या मुजोर टॅक्सीचालकाला चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
MH o1 AY 3403 या क्रमांकाची टँक्सी चालवणाऱ्या अब्दुल कसाम सत्तार या मुजोर टॅक्सीचालकाने एका प्रवासी महिलेशी हुज्जत घालून जबरदस्तीने टॅक्सी दूरपर्यंत नेली, मीटरपेक्षा जास्त पैशांची मागणी करत दादागिरी केली. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे.
अब्दुल कसाम सत्तारने मीटरपेक्षा जादा पैशांची मागणी केल्याने त्याच्या टॅक्सीत बसलेली धारावी येथील महिला टॅक्सीतून उतरत होती. परंतु अब्दुल सत्तारने बळजबरीने महिलेला टॅक्सीतून उतरु न देताच टॅक्सी वेगाने पुढे पळवली आणि जादा पैशांची मागणी करत दादागिरी केली. या प्रकरणानंतर मनसैनिकांनी या टँक्सीवाल्याला भर रस्त्यात चोप देत महिलेची कान धरुन माफी मागायला लावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
