coronavirus | शनिवारपासून नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केट बंद
माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या मागणी नंतर एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. भाजी , फळ, कांदा बटाटा मार्केट येत्या शनिवार (11 एप्रिल) पासून बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत.
मुंबई : जीवनावश्यक गोष्टींची कमतरता मुंबईला पडू नये यासाठी वाशी येथील एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता. मात्र आता मसाला मार्केटचा व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या मागणी नंतर एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. भाजी , फळ, कांदा बटाटा मार्केट येत्या शनिवार (11 एप्रिल) पासून बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत.
दुसरीकडे दाना मार्केटच्या माध्यमातून मुंबईत 2.5 लाख टन अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्याने पुढील एक महिना पुरेल येवढा साठी शिल्लक आहे. त्यामुळे राज्यभरातून आणि परराज्यातून आलेले अन्नधान्य मुंबई , उपनगर , नवी मुंबईत पोहचविल्यानंतर दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. रविवारी याबाबत माथाडी कामगार , व्यापारी प्रतिनिधी , एपीएमसी प्रशासन बैठक घेणार आहे. त्यानंतरचं निर्णय देणार आहे. मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा एपीएमसी मधून मुंबईत करण्यात आल्याने बाजार पुढील काही दिवस बंद राहिला तरी लोकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे करण्यात आले आहे.
Coronavirus | कसला लॉकडाऊन आणि कसलं काय! वरळी नाक्यावर भाजी खरेदीसाठी गर्दी
वाशी एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केट सोमवारपासून बंद
वाशी एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केट सोमवार पासून बंद होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुंबई, उपनगरात माल पोहोचविल्यानंतर सोमवार पासून लाॅकडाऊन जोपर्यंत राहिल तोपर्यंत मार्केट बंद राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
पुण्यातील मार्केटयार्ड अनिश्चित काळासाठी बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील मार्केटयार्ड अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. मार्केटयार्ड आडते असोसिएशनने 10 एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व परिसर सील करुन कर्फ्यू सुद्धा लावला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे. मार्केटयार्ड परिसरात सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे. मार्केट यार्ड परिसर आणि त्याच्या पूर्वेकडील भाग सील करण्यात आला आहे. इथे फक्त बाहेरुन मालाची आवक होत आहे. तसंच घाऊक व्यापाऱ्यांनाच इथे खरेदीसाठी परवानगी दिली जात आहे. याशिवाय बाहेरुन आलेल्या ट्रक, टेम्पोंना गटागटाने आत प्रवेश दिला जात आहे. कामगार, तोलणार टेम्पो संघटनांचे सर्व सदस्य 10 एप्रिलपासून मार्केटयार्डमध्ये येणार नाहीत. परिणामी इथला चढउतार बंद होणार आहे. त्यामुळे आडते असोसिएशनने 10 एप्रिलपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 10 एप्रिलपासून कोणत्याही प्रकारच्या शेतमालाची आवाक करु नये, असं आडते असोसिएशनने म्हटलं आहे.