एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai News : मुंबईच्या संवेदनशील यलो गेटमध्ये घुसलेल्या अज्ञात कारचा शोध; तीन जण अटकेत, जिवंत काडतुसे देखील हस्तगत

Mumbai News : मुंबईच्या संवेदनशील यलो गेटमध्ये घुसलेल्या अज्ञात कारचा शोध मुंबई पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी या कारमध्ये असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. या कारमधून 20 जिवंत काडतुसे असलेले मॅगझिन देखील हस्तगत केले आहेत.

मुंबई : मुंबईच्या संवेदनशील यलो गेटमध्ये (Yellow Gate) घुसलेल्या अज्ञात कारचा शोध मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी या कारमध्ये असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. शिवाय या कारमधून 20 जिवंत काडतुसे (Cartridges) असलेले मॅगझिन देखील हस्तगत केले आहे. गौरेश मोहित वगळ (वय 27 वर्षे), श्रेयस किरण चुरो (वय 25 वर्षे) आणि अभिषेक अजित माणगांवकर (वय 24 वर्षे) अशी अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावं आहेत. कारमधील हे तिघे रस्ता चुकल्याने त्या गेटमध्ये शिरले होते की यामागे दुसरं काही कारण आहे, याचा तपास आता यलो गेट पोलिसांकडून केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

ईस्टर्न फ्रीवेच्या दक्षिणेकडील टोकाला असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (Mumbai Port Trust) यलो गेटमध्ये शनिवारी रात्री दोनच्या सुमारास एक घुसली होती. ही कार आत गेल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सीआयएसएफ (CISF) जवान दुर्गा हरीराम जैस्वाल यांनी कारचा पाठलाग केला. यावेळी त्यांची सर्व्हिस रायफल कारच्या मागील दारावर आदळली आणि त्यावेळी रायफलचे मॅगझिन, ज्यामध्ये 20 जिवंत काडतुसे होत ते कारमध्ये पडले. कारने यू टर्न घेत तिथून निघाली. यलो गेट सोडल्यानंतर चालक माहिमच्या दिशेने जात असल्याचं समजलं. या गाडीत तीन जण होते. सोबतच हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.

आरोपींना पकडण्यासाठी पथकं तयार

यानंतर या प्रकरणात सीआयएसएफ जवानाने यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या त्यांच्या तक्रारीवरुन भा.दं.वि. कलम 279,336,447,403  अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलीस तेव्हापासून कारचा शोध घेत होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथकं देखील तयार केली होती. 

आरोपी अटकेत आणि काडतुसे जप्त

तपासादरम्यान घटनास्थळी प्राप्त केलेल्या फुटेजवरुन वाहनाची MH01 CD ही सीरिज आणि त्याचा मॉडेल निष्पन्न झालं होतं. पुढील तपास करत ही कार ज्या ज्या मार्गाने गेली होती तिथले सीसीटीव्ही फुटेज मिळवले. दुसरा पर्याय म्हणून राज्य परिवहन विभागातील वरिष्ठांशी संपर्क साधून MH01-CD या सीरिजच्या सर्व यादी प्राप्त मिळवल्या. अशा एकूण 86 वाहनांचं भौगोलिक विश्लेषण तसंच प्राप्त सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक अभ्यास करुन वाहनाच्या शेवटच्या लोकेशनपर्यंतचा मागोवा घेऊन गुन्ह्यातील वापरलेलं वाहन आणि आरोपींना पकडलं. यासोबतच सीआयएसएफ जवानाच्या सर्व्हिस रायफलच्या मॅगझिनमधून पडलेली 20 जिवंत काडतुसे देखील ताब्यात घेतली.

VIDEO : Mumbai Yellow Gate : सीआयएसएफ जवानांची नजर चकवून कार यलो गेटमध्ये शिरली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Embed widget