'गाण्या'वरुन मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला; अमृता फडणवीसांचा ट्वीट करत पलटवार
Amruta Fadnavis Tweet :मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे
Amruta Fadnavis Tweet On CM Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं टीका करत असल्याचं दिसत आहे. मात्र काल महाउत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात, असं म्हटलं अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग देखील केलं आहे.
मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अबजाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 2, 2022
छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात !! @OfficeofUT pic.twitter.com/UsEXftApk1
अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. आम्ही याकडे जोक म्हणून बघतो. आम्ही अशा चिरकुट लोकांकडे बघतही नाही, असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाकरे सरकारने महाउत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचाऱ्यासोबत IAS अधिकाऱ्यांना देखील आपली कला या मंचावर सादर केली. या महाउत्सव प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीस याचं नाव न घेता टोमणा मारला होता. "राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. आजपर्यंत एकच व्यक्ती गाते येतं, असं मला वाटत होतं," असं म्हणत अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता.
संबंधित बातम्या
मुख्यमंत्र्यांनी लुटला महाउत्सवाचा आनंद, नाव न घेता अमृता फडणवीस यांना टोमणा
घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये; दिपाली सय्यद यांची फडणवीसांवर टीका
योगी बनण्यासाठी फडणवीस बायकोला सोडणार आहेत का? दीपाली सय्यद यांचं वादग्रस्त वक्तव्य