एक्स्प्लोर

Central Railway : पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे घसरले, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा

Central Railway : हार्बर मार्गावरील पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. याचा परिणाम लांब पल्ल्ल्याच्या गाड्यांवर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावरील पनवेल (Panvel) ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे चार डबे रुळावरुन खाली घसरले. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण याचा परिणाम लांब पल्ल्याच्या (Express) गाड्यांवर झाल्याचं पाहायला मिळतयं. या घटनेमुळे एक्सप्रेसच्या पाच गाड्या उशीरा धावत असल्याची माहिती मध्ये रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान ही वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न मध्ये रेल्वेकडून करण्यात येत आहे. 

नेमकं काय घडलं?

शनिवार (30 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी पनवेलवरुन वसईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले. यामध्ये वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान या घटनेविषयी समजातच मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी पथक पाठवण्यात आले. तसेच कल्याण आणि कुर्ला स्थानकावरुन अॅक्सिडेंट रिलीफ रेल्वे घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. 

रुळावरुन घसरलेले डबे बाजूला सारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान हे डबे कसे घसरले याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश मध्य रेल्वेकडून देण्यात आलेत. पण या दुर्घटनेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. तसेच यामुळे प्रवाश्यांना देखील त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोणत्या गाड्यांचा झाला खोळंबा ?

या अपघातामुळे पाच एक्सप्रेस रखडल्या आहेत. यामध्ये डाऊन मार्गावरील गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ही कळंबोली स्थानकावर थांबवण्यात आली. तसेच एलटीटी-मंगळुरु एक्स्प्रेस  ही ठाणे स्थानकावर थांबण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल-सावंतवाडी एक्स्प्रेस ही तळोजा ते पंचानंद स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. तसेच अप मार्गावरील कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस आणि एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस या सोमाठाणे रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. 

लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम नाही

लांब पल्ल्याच्या गाड्यांवर जरी परिणाम झाला असला तरीही लोकलच्या वेळापत्रकावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाल्याचं यावेळी मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. दिवा ते पनवेल या मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक देखील सुरळीच सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.  तसेच लवकरच डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रेल्वे या नियोजित वेळेमध्येच स्थानकावरुन सुटणार आहेत. पण अप मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्यांना काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल, असं मध्य रेल्वेने म्हटलं आहे. 

हेही वाचा : 

Palghar News : डबे सुटले, इंजिन पळालं अन् प्रवासी घाबरले; वैतरणा स्थानकातील धक्कादायक प्रकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat visit Hostel : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतीगृहाची पाहणीManu Bhakar : मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही शिफारस नाहीABP Majha Headlines :  11 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Embed widget