एक्स्प्लोर

Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Egg Price Hike : तापमानात घसरण होताच दरवर्षीप्रमाणे अंड्यांचे दर देखील वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. 

नंदुरबार : हिवाळ्याच्या (Winter) दिवसात थंडी वाढत असल्याने अंडी (Egg) खाणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे अंड्याची मागणीत वाढ झाली असून अंड्याच्या दरावर परिणाम होत आहे. अलिकडच्या काळात, किरकोळ बाजारात 30 अंड्यांचा कॅरेट 180 रुपयांना मिळत होता, मात्र आता हा दर 200 रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ दरात 5 रुपयांनी मिळणारे अंडे आता 7 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातील तापमान 10 अंशाच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळत आहे. तापमानात घसरण होताच दरवर्षीप्रमाणे अंड्यांचे दर (Egg Price Hike) देखील वाढले आहेत. होलसेल दरात मिळणाऱ्या अंड्याच्या कॅरेटला 200 रुपयांचा भाव आला आहे. 180 रुपये दराने मिळणारे अंड्याचे कॅरेट आता 200 रुपयांवर पोहोचले आहे. 

गावरान कोंबडीची अंडी 10 रुपयांना

किरकोळ दरात 5 रुपयांनी मिळणारे अंडे आता 7 रुपयांना मिळणार आहे. गावरान कोंबडीच्या अंड्यांच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 8 रुपये दराने मिळणाऱ्या गावरान कोंबडीची अंडी आता 10 ते 12 रुपयांना मिळणार असल्याने सर्व सामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. 

अंड्याच्या पदार्थांचे भाव वाढणार

दरम्यान, गेल्या वर्षी पाच ते सहा रुपयांना नग मिळणारे अंडे गेल्या महिन्यात पाच रुपयांना मिळत होते, आता ते सात रुपयांना झाले आहेत. कोंबड्यांचे खाह्य महागल्याने देखील अंड्याचे दर वाढले आहेत. अजून किमान अडीच महिने ही दरवाढ राहणार आहे, असे सांगितले जात आहे. अंड्याच्या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल्स आणि टपऱ्यांवर होणार आहे. ऑम्लेट, अंडाभुर्जी, अंडा-करी यांसारखे पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांना उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्यांच्या पदार्थांचे दर वाढवावे लागतील. परिणामी, सामान्य ग्राहकांना या पदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला आवश्यक प्रथिनांसाठी अंडी खाल्ली जातात, त्यामुळे अनेकांना आपल्या आहारात बदल करावा लागणार असल्याचे चित्र आहे. तर सामान्य लोकांसाठी अंड्यांच्या दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Health: बाई... दररोज 2 अंडी खाल्ल्यानं शरीरात 'असे' होतात बदल? आश्चर्यचकित व्हाल! तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

अंडी आरोग्यदायी, पण त्यातील पिवळा भाग खावा की खाऊ नये? आहारतज्ज्ञांचं म्हणणं काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Bhondekar : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामानाट्यानंतर यूटर्नTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Embed widget