एक्स्प्लोर

Tejasvee Ghosalkar : ठाकरेंना मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकरांचा सेनेला 'जय महाराष्ट्र', भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

Tejasvee Ghosalkar To Join BJP : माजी आमदार विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सूनबाई तेजस्वी घोसाळकर आता भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता दादरच्या वसंत स्मृतीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत.

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर या पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेवर त्यांची संचालक म्हणून वर्णी लागल्यानंतर त्या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती.

Mumbai Bank : मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. ते त्यावेळी मुंबै बँकेचे संचालक होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबै बँकेवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची सत्ता असून त्यांच्याच नेतृत्वाखाली संचालकांनी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार अशी चर्चा सुरू झालीय

मुंबै बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती होण्यापूर्वी, तेसस्वी घोसाळकर यांनी 13 मे रोजी ठाकरेंच्या शिवसेनेच्या दहिसर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या महिला शाखेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एका महिन्याच्या आत तेजस्वी घोसाळकरांची मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती.

Tejasvee Ghosalkar News : भाजप प्रवेशाची चर्चा 

मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर विनोद घोसाळकरांनी त्यावर स्पष्टीकरण देत तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं होतं. विनोद घोसाळकरांनी त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. 

तेजस्वी घोसाळकरांवर पक्षप्रवेशासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यावेळी विनोद घोसाळकरांनी केला होता. तसेच काहीही झालं तरी आपण ठाकरेंसोबतच राहणार, त्यांची साथ सोडणार नसल्याचं विनोद घोसाळकरांनी स्पष्ट केलं होतं. विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे निष्ठावंत मानले जातात. त्यामुळे विनोद घोसाळकर आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ही बातमी वाचा:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Embed widget