एक्स्प्लोर

Mahesh Jethmalani vs Sunil Prabhu MLA Disqualification Case : व्हीपच्या मुद्यावर जेठमलानी यांचा अॅटक मोड, तर प्रभू डिफेन्सिव्ह मोडवर; आज दिवसभरात शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत काय घडलं?

Shiv Sena MLA disqualification case Live Sunil Prabhu vs Mahesh Jethmalani: शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी वि. सुनील प्रभू असं घमासान आजही सुरु आहे.

मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. मागील दोन दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu MLA) यांची एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी उलट तपासणी घेतली. आजही ही उलट तपासणी सुरु आहे.  पहिल्या दिवशी इंग्रजी भाषेतील मुद्द्यावरुन जेठमलानी यांनी सुनील प्रभूंवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्या प्रश्नांना सुनील प्रभू यांनीही चाणाक्षपणे उत्तरं दिली. मग काल दुसऱ्या दिवशी व्हिपवरुन खडाजंगी झाली. महेश जेठमलानींच्या यॉर्कर्सना सुनील प्रभूंनी सिक्सर मारल्याची भावना ठाकरे गटाने व्यक्त केली. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही विधानसभेत घमासान पाहायला मिळत आहे.

शिंदे गटाकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ महेश जेठमलानी यांचे सवाल  

प्रश्न 37 - आमदार निवासात व्हीप पाठवलात असं तुम्ही म्हटलंत..ते कुठलं? एमएलए हॉस्टेल का?

सुनील प्रभू उत्तर - होय

प्रश्न - 20 जूनला शिवसनेच्या किती आमदारांनी मत दिलं होतं?

उत्तर - प्रतिज्ञापत्रात दिलंय

जेठमलानी - मला थेट आकडा अपेक्षित आहे...

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा आक्षेप, हा काय सवाल आहे....याचं उत्तर स्पष्टपणे दिलंय. त्यावेळी शिवसेनेत असलेल्या सर्वांनी मत दिलं होतं

अध्यक्ष पुन्हा सुनील प्रभू यांना प्रश्न समजावतायत

सुनील प्रभू - आकडा पटलावर आहे. मला पुन्हा पुन्हा का विचारताय, मी यापूर्वीच सांगितलंय शिवसेनेच्या सर्व 55 सदस्यांनी मतदान केलं होतं 

प्रश्न - 37 आणि 40 व्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही म्हटलंत 9 जण पक्ष कार्यालयात उपस्थित होते, मग बाकीचे 46 आमदार निवासात होते का?

(भाषांतर करताना साक्षीदाराला संकेत दिले जातायत, हळूचपणे उत्तर बदलण्याचे संकेत दिले जातायत)
शिंदे गटाच्या कनिष्ठ वकिलांचा आरोप

सुनील प्रभू - माझं लक्ष विचलित केलं जातंय  

असं असेल तर मी केवळ एका वकिलालाच इथं प्रवेश देईन, त्यामुळे सर्वांनी भान आणि मर्यादा राखावी - अध्यक्ष 

सुनील प्रभू - - मी विसरलो, आता मला सारं परत आठवावं लागेल
मी सगळे नियम पाळतो....

अध्यक्ष - हो, ते मला माहितीय सभागृहात तुम्ही काय करता... 

सुनील प्रभू - मी आमदार निवास व्हीप पाठवलं होतं बाकीच्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला 

जेठमलानी - प्रश्न 38 मध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही आमदार निवासात व्हीप दिलात की, तो देण्याचा अयशस्वी प्रयत्न केलात?

सुनील प्रभू - भाषा जशी वळवाल तशी वळते. मी म्हणालो की जे माझ्यासोबत पक्ष कार्यालयात होते त्यांना तिथं दिलं, बाकिच्यांना जिथ संपर्क झाला तिथं देण्याचा प्रयत्न केला 

जेठमलानी - आमदार निवासातील किती आमदारांना व्हीप दिलात?

प्रभू - किती ते आठवत नाही, पण मला आठवतंय की, आमदार निवासात दिला होता, आणि बाकीचे जिथे होते तिथं जाऊन देण्याचा प्रयत्न केला होता 

जेठमलानी - तुम्ही हा व्हीप व्यक्तिश: बजावला नव्हतात. मग तो बजावला आहे, हे कशाच्या आधारावर बोलताय?

प्रभू - मी व्हीप सही करून जारी करतो. तो कर्मचारी त्या व्यक्तीला नेऊन देतात. तो कोणाला मिळाला हे त्यानं केलेल्या सहीवरून समजतं. तो व्हीप कोणी स्वीकारला याच्या सह्या पक्ष कार्यालयात आहेत. 

जेठमलानी - तो व्हीप कोणी स्वीकारला याच्या सह्या पक्ष कार्यालयात आहेत.  जर हा रेकॉर्ड आहे तर तो इथं का सादर केलेला नाही

प्रभू - हे खोटं आहे 

जेठमलानी - 37 व्या प्रश्नाच्या उत्तरं तुम्ही म्हणालात की, जे प्रत्यक्ष उपलब्ध नव्हते त्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवलात. तो तुमच्या मोबाईलवरनं पाठवलात का?

प्रभू - माझ्याकडून निरोप जातो, फोन जातो. त्यावेळच्या धावपळीत माझ्याकडून ते शक्य नव्हतं. यापूर्वीही मी कधी तो पाठवले नाहीत. मी प्रतोद असल्यापासून आणि त्याच्याआधीपासून व्हीपचा मेसेज पक्ष कार्यालातील कर्मचाऱ्याकडून दिला जातो.  हे व्हीप मी मनोज चौगुले या कर्मचा-याच्या माध्यमातून पाठवलं  

जेठमलानी - हा व्हीप मनोज चौगुलेंच्या व्हॉट्सअैप वरून पाठला होता का?

प्रभू - मी मनोज चौगुलेंना सांगितलं होतं, त्यानुसार त्यांनी तो पाठवला.

जेठमलानी - तुम्ही त्यांचा मोबाईल पाहिला का?, की त्यांनी सांगितलं आणि तुम्ही मानलं?, तुम्हाला ते तसं कळलं?

प्रभू - त्यानं सांगितलं मी मानलं

जेठमलानी - मनोज चौगुलेचा फोन किंवा त्यांचा फोन इथं सादर केलेला नाही. तसेच त्यांचा इथं साक्षीदार म्हणून उल्लेख नाही. त्यामुळे व्हीपच्या बाबतीत कोणताही मेसेज कुठल्याही आमदाराला पाठवलेला नाही. त्यामुळे हे साफ खोट आहे.

प्रभू - हे खोटं आहे.

जेठमलानी - तुम्ही खोट बोलताय, म्हणूनच मनोज चौगुलेंना इथ साक्षीदार बनवलेलं नाही. कारण व्हीपचा कुठलाही मेसेज कधी पाठवलाच नव्हता.

(ठाकरे गटाच्या कनिष्ठ वकिलांनी जेठमलानींच्या प्रश्नावर आक्षेप घेतला. यावर जेठमलानी संतापले. त्यानंतर देवदत्त कामत आणि जेठमलानी यांच्यात वैयक्तिक पातळीवर जुंपली. मात्र अध्यक्षांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केलं.)

प्रभू - जे मी पाठवलंय, ते रेकॉर्डवर आहे.

जेठमलानी - व्हीप नेमका कशासाठी बजावतात?, मिटींगसाठी की वोटींगसाठी?, बैठकिच्या अजेंड्यात त्याचा उल्लेख होता का? कागदावर दाखवा. त्या रात्री अचानक मिटिंग बोलावण्यामागे काय कारण होतं?, याची नोंद आहे का?

प्रभू - असं कारण पक्षादेशात कुठेच नमूद नसतं, केवळ बैठकीचा आदेश असतो. व्हीप दोन प्रकारचे असतात, एक मतदानाचा असतो, एक बैठकीचा असतो. हा बैठकिचा होता.

जेठमलानी - तुम्ही व्हीपबाबत खोटी कागदपत्र सादर केलीत. इथं आणि सर्वोच्च न्यायालयातही.

प्रभू - मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो. मी बोलतोय ते सत्यय, हे बोलतायत तो खोटंय

जेठमलानी - तुम्ही जी कागदपत्र सादर केलीत, ती कोणी तयार केलीत?

प्रभू - तो पक्ष कार्यालयात माझ्यासमोर बनवला गेलाय

जेठमलानी - यावर म्हटलंय, 'पक्षादेश क्रमांक 2/2022' हे कोणाचं हस्ताक्षर आहे?

प्रभू - नंबर टाकणं हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. ते कोणी लिहिलंय हे मला माहिती नाही.

जेठमलानी - तो किती वाजता टाकला याची माहिती देऊ शकाल का?

प्रभू - वेळ कसा सांगता येणार?

जेठमलानी - तुम्ही ते आदेश किती वाजता दिलेत?

प्रभू - ज्या क्षणी व्हीप काढण्याचा आदेश दिला, त्यावेळी तो नंबर टाकून सही केली गेली. हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे.

जेठमलानी - त्यावरच्या सह्या कधी घेतल्या गेल्या?

प्रभू - व्हीप दिला तेव्हा घेतल्या

(कामत त्यांना ते कागद दाखवले जावेत. जेठमलानींचा आक्षेप, त्यांना ते दाखवलेत, त्यांनी पुन्हा मागवले नाहीत. त्यांना काही कागद दाखवले, मात्र त्यावर ठाकरेंच्या वकिलांचा आक्षेप, त्यांना काय दाखवताय ते आम्हालाही दाखवा. जेठमलानींचा आक्षेप, तो तुम्हाला दाखवायची गरज नाही)

(सुनील प्रभू वकिलांच्या आक्षेपानं गोंधळले.)

जेठमलानी - ही त्यांनीच तयार केलेली कागदपत्र आहेत, जी सर्वोच्च न्यायालयात सादर केलीत. मग आज ती त्यांनाचा का ओळखता येत नाहीत?

प्रभू - सदस्य उपलब्ध झाले तेव्हा सह्या घेतल्या

जेठमलानी : अपात्रता याचिकेतील कागदपत्रांची हीच मूळ प्रत आहे का?

प्रभू : होय, ही एकच ओरिजनल कॉपी आहे.

जेठमलानी : ती तारीख कोणी टाकलीय?

प्रभू : तारीख कार्यालयीन कर्मचा-यानं टाकलीय, ते मी कसं सांगणार?

जेठमलानी : अपात्रता याचिकेच्या मूळ प्रतीची ही कॉपी योग्य आहे का?

प्रभू : ती कॉपी आहे, अचूक आहे की नाही. हे मी कसं सांगणार

जेठमलानी : तुम्ही सर्वोच्च न्यायालयात आणि इथं या कॉपीची शहानिशा केली नाहीत का? इथंच पाणी मुरतंय...

प्रभू : जे कागद माझ्याकडे उपलब्ध होते ते मी सादर केलेत 

जेठमलानी : तुम्हाला ही कागदपत्र मराठीत समजावली गेलीत, त्यामुळ हीच मूळप्रत आहे हे तुम्ही कोर्टात मान्य केलयंत का?

प्रभू : मला आठवत नाही.

जेठमलानी : हे सर्व कागदपत्रांच्या बाबतीत तुमच्याकरता लागू होतं का?

प्रभू : नाही

जेठमलानी : हातानं लिहिलेली तारीख अपात्रता याचिकेच्या मूळप्रतिच्या कॉपीवर कुठेही लिहिलेली नाही

प्रभू : होय मी ते बघतोय, ती इथं नाही. झेरॉक्स करताना ती कदाचित आली नसावी.

जेठमलानी : याच कारण ती तारीख नंतर टाकलीय

सुनावणी उपहारासाठी 3:15 पर्यंत तहकूब,

दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर सुनावणी सुरू

जेठमलानी - ठराव जो तयार केला तो कोणी तयार केला ?

प्रभू - वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलवली होती.. त्या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते...आमदार उपस्थितीचे कागदपत्र अध्यक्षांकडे सादर केले. उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले आणि त्यावेळी ठराव मांडला

जेठमलानी - माझा थेट प्रश्न असा आहे की हा ठराव कोणी तयार केला ? कोणत्या व्यक्तीने हा ठराव तयार केला 21 जूनला ? 

प्रभू - हा ठराव तयार करणे एक प्रक्रियेचा कामकाजाचा भाग आहे...ज्यांनी अनुमोदन दिलं त्याच्या सह्या त्यावर आहे. 

जेठमलानी - कोणी अशी व्यक्ती असते का ? ज्यांनी हा ठराव मांडला

प्रभू - रवींद्र वायकर यांनी ठराव मांडला

जेठमलानी - डॉक्युमेंट मध्ये उदय सामंत दादा भुसे, संजय राठोड यांनी अनुमोदन दिला अस तुम्ही म्हणताय पण कथित ठरावात त्यांनी अनुमोदन दिलेले नाही

प्रभू - त्यांनी या ठरावावर माझ्या समोर सह्या केल्या आहेत. हे सगळं मी सादर करतो.  ज्यांनी ठरावावर सह्या केल्या त्याची कागदपत्र अध्यक्षांकडे सादर केली आहे. मी आय विटनेस आहे. 

जेठमलानी - उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या समोरील केलेल्या सह्या खऱ्या नाहीत त्यांच्या त्या सह्या नाहीत 

प्रभू - हे खोट आहे 

जेठमलानी - सदर स्वाक्षऱ्या या तुमच्या समक्ष करण्यात आलेल्या असल्याने आणि या त्यांच्या खऱ्या सह्या नसल्याने या बनावट सह्यासाठी तुम्ही जबाबदार आहात ? 

अध्यक्ष - त्यांचा म्हणणं आहे की या तीन जणांनी सह्या केलेल्या नाहीत त्या बनावट सह्या असतील तर त्याला आपण जबाबदार आहेत

प्रभू - तुम्ही मला गुन्हेगार बनवत आहात, मी खोटं कसे बोलेल ..मी संविधानाची शपथ घेतली आहे. 

जेठमलानी - 21 जूनच्या कथित बैठकीत असा कुठलाही ठराव पारित झाला नसल्याचा मी तुम्हाला सांगू इच्छितो.

प्रभू- 21 जूनला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदारांच्या बैठकीत हा ठराव पास झाला.

जेठमलानी - 21 जून च्या कथित बैठकीत दादा भुसे, उदय सामंत आणि संजय राठोड यांनी केलेल्या सह्या करताना उद्धव ठाकरे यांनी पाहिलं का? 

प्रभू - मी प्रत्यक्ष सह्या करताना पाहिलंय. ठराव सुचकाने सुचवून सह्या केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी सह्या करताना पाहिले. उद्धव ठाकरे या बैठकीचे अध्यक्ष होते.

जेठमलानी - या कथित बैठकीत ठराव पास करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठीची बैठक कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यत चालली

प्रभू - वर्षा बंगला दुपारी साडे 12 ते साडे 4 पर्यत बैठक चालली

जेठमलानी - 21 जूनला एकनाथ शिंदे यांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला जात होता. उद्धव ठाकरे यांनी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मध्यस्थ पाठविले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून हटविण्याबाबत ठराव 21 जून ला होऊ शकला नाही?

प्रभू- उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यात ठराव पास करण्यात आला.

जेठमलानी - आपल्याला दाखवलेल्या याचिकेत प्रतिवादी क्रमांक 16 आणि 22 हे  संजय राठोड आणि दादा भुसे आहेत का ?

प्रभू - हो आहेत

जेठमलानी - आपण अध्यक्षांसमोर प्रतिज्ञापत्रात म्हणतात की दादा भुसे आणि संजय राठोड हे बैठकीला हजर होते मात्र सर्वोच्च न्यायालयात तुम्ही प्रतिज्ञापत्र असे म्हटले आहात की हे दोघे गैरहजर होते हे आपले परस्पर विरोधी विधानांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे

प्रभू - हे रेकॉर्डवर आहे. 

जेठमलानी - आपल्याला दाखवलेल्या याचिकेत प्रतिवादी क्रमांक 16 आणि 22 हे संजय राठोड आणि दादा भुसे आहेत का ?

प्रभू - हो आहेत.

जेठमलानी - आपण अध्यक्षांसमोर प्रतिज्ञापत्रात म्हणतात की दादा भुसे आणि संजय राठोड हे बैठकीला हजर होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात तुम्ही प्रतिज्ञापत्र असे म्हटले आहात की हे दोघे गैरहजर होते. हे आपले परस्पर विरोधी विधानांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे.

प्रभू - हे रेकॉर्डवर आहे.

आजची सुनावणी संपली असून आता मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

संबंधित बातम्या

Shivsena MLA Disqualification : जेठमलानींचे यॉर्कर, प्रभूंचे सिक्सर ;अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?

MLA Disqualification Case : सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप बनावट : Mahesh Jethmalani

Shiv Sena MLA Disqualification : जेठमलानींचे प्रश्न, सुनील प्रभूंची उत्तरे; सुनावणीत नेमकं काय झालं? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
Atul Kulkarni Poem:
"लोक चिरडले जातात... लोकांची प्रेतं बनतात..."; अतुल कुलकर्णींनी रचलेली नवी कविता 'लोक-मताची डुबकी'
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.