आदिलभाईंनी घरी नेऊन जेवू घातलं, सुखरुप पोहोचवलं; काश्मीरमधीलं माणुसकीचं उदाहरण, रुपाली ठोंबरेंच्या डोळ्यात पाणी
आदिल हे ड्रायव्हर असून त्यांनी नाशिकच्या पर्यटकांना त्यांच्या घरी नेऊन जेवायला घातलं. त्यानंतर, सुखरुपपणे एका हॉटेलमध्ये पोहोचवलं.

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांच्या (Terror attack) हल्ल्यात 28 भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. मात्र, दहतवाद्यांनी धर्म विचारला आणि गोळ्या मारल्याचे काही पर्यटकांनी म्हटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे देशभरातून पहलगामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांच्या मदतीलाही तेथील मुस्लिम (Muslim) टुरिस्ट गाईड, ड्रायव्हर हेच पोहोचल्याचंही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali thombare) यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात संपूर्ण कहानी सांगितला. आदिलभाईंनी दाखवलेला माणुसकीचा धर्म सांगताना रुपाली ठोंबरेंच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. सध्या हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आदिल हे ड्रायव्हर असून त्यांनी नाशिकच्या पर्यटकांना त्यांच्या घरी नेऊन जेवायला घातलं. त्यानंतर, सुखरुपपणे एका हॉटेलमध्ये पोहोचवलं. आदिलभाईंच्या मदतीची आणि माणूसकीची कहानी सांगताना कधीकाळी हिंदुत्ववादी पक्षाच्या महिला नेत्या असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्याही डोळ्यात पाणी आलंय. टुरिस्ट अॅक्टीव्हीस्ट आदिलभाईंनी यांना जी मदत केलीय ती शब्दात सांगू शकत नाही, असे म्हणताच रुपाली ठोंबरे गहिवरल्याचं दिसून आलं. आदिलभाई रडायला लागले आहेत, कारण त्यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे. आता, इथे कुणीही पर्यटक येणार नाहीत. यांनी सगळ्या गाड्या लोनवर घेतलेल्या आहेत. यापुढे, त्यांना कुठलाही रोजगार मिळणार नसून मोठी बेरोजगारी आता यांच्यावर येणार असल्याचेही रुपाली ठोंबरे यांच्यासममवेत असलेल्यांनी म्हटले.
विमानाची सोय करुन द्यावी - ठोंबरे
माझी सरकारकडे विनंती आहे की, तुम्हाला जी कारवाई करायची आहे, ती करा पण पर्यटकांना त्यांच्या घरी तातडीने पोहचवण्याची तयारी करा. इथे परिस्थीती बिकट आहे. अनेक लहान मुले आमच्यासोबत आहेत. ते सेफ नाहीत. मी माझ्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून विमानाची सोय करून द्या अशी विनंती केली आहे. तातडीने सर्व मदत करून द्यावी, पर्यटकांना लवकरत लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे, असंही ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी कृत्य केलं ते हैवान - ड्रायव्हर आदिल
जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे, हे व्हायला नव्हतं पाहिजे. येथील अर्थकारण हे पर्यटनावरच अवलंबून आहे. इथं लहान-लहान मुलंही होती. ज्या कुणी हे कृत्य केलंय ते हैवानच आहेत, ते माणूस असूच शकत नाहीत, असे म्हणत टुरिंस्ट ड्रायव्हर आदिलभाईंनी घडलेल्या घटनेवर दु:ख आणि शोक व्यक्त केलाय. चूक कोणीतरी एकजण करतंय पण बदनाम सर्वजण होतात. ही माणूसकीची हत्या आहे, असे आदिलभाई यांनी या व्हिडिओत बोलताना म्हटले.
हिंदू संकटात असताना मुस्लिम मदतीला येतात
ही कश्मीरची वस्तुस्थिती... रूपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासह सहलीला गेल्या होत्या. त्यांच्यासह जवळपास 100 लोक अडचणीत आल्यानंतर स्थानिक आदिलभाई यांनी आश्रय दिला सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. आतंकवाद्यांनो, हेही चित्र एकदा बघून घ्या... हिंदू संकटात असताना मुस्लिम मदतीला धावून येत आहेत. पर्यटन बंद झाले तर कश्मीरी मुस्लिम उपाशी मरेल या विचाराने हिंदूंच्या डोळ्यात पाणी येत आहे, अशी भावनिक पोस्ट सुषमा अंधारे यांनी लिहिली आहे. राजकारण करणाऱ्या नेत्यांनो आणि गोबरभक्तांनो हा हल्ला जात किंवा धर्मावरचा नाही हा हल्ला माणुसकीवरचा आहे. हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावरचा आहे. ऊरी , पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगाम झाल्यानंतरही अजूनही कुणाला वाटत असेल की हा देश सुरक्षित हातात आहे तर शोकांतिका आहे, असे म्हणत केंद्र सरकारवर देखील सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला.
























