एक्स्प्लोर

Mumbai Traffic : गाडीवरील दंड भरा अन्यथा कोर्टात खेचलं जाणार, वाहतूक पोलिस देणार थकबाकीदारांना नोटीस

Mumbai Police : मुंबईत वाहतूक पोलिसांनी कारवाई करूनही 171 कोटींचा दंड अद्याप भरण्यात आलेला नाही. अशा थकबाकीदारांना गणपतीनंतर नोटीस देण्यात येणार आहे. 

मुंबई: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ई-चलानद्वारे वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करूनही दंड भरला जात नसल्याचं चित्र आहे. परिणामी दंडाच्या थकबाकीचा आकडा वाढत असून 20 हजार आणि त्यापेक्षा अधिक प्रलंबित असलेला दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिस आता थकबाकीदार वाहन मालकांच्या घरी नोटीस पाठवणार आहेत. ही नोटीस वाहन चालकांना गणपतीनंतर देण्यात येणार आहे. त्यानंतर जो कोणी 15 दिवसात दंड भरणार नाही त्याच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू केला जाणार आहे.

मुंबई शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास 34.61 लाख चालकांविरोधात कारवाई करत 247.82 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये दंड वाहन चालकांनी भरलेले आहेत. तर उर्वरित 171 कोटी रुपायंचा दंड भरण्यासाठी वाहन चालकांना गणपतीपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीपर्यंत दंड भरण्यात आला नाही तर पुढे पोलीस प्रत्येक वाहन धारकाला नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात जाईल. त्यामुळे आपल्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणताही दंड असल्यास तो त्वरित भरा, अन्यथा कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. 

यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस जागेवरच रोख रक्कम स्वीकारून दंड आकारत होते. मात्र ते करताना पोलिसांकडून तडजोड व्हायची. तसेच पोलिसांबरोबर खटके उडायचे. असे प्रकार रोखण्यासाठी 2016 पासून ई-चलन प्रणाली लागून करण्यात आली होती. ई- चलन यंत्राद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर दंड आकारला जातो. हा दंड संबंधित वाहनावर जमा होतो. वाहतूक पोलिसांच्या महाट्रॅफिक या ॲपवर जाऊन तो 14 दिवसांच्या आत ऑनलाईन भरायचा असतो. मात्र वाहन चालक दंड भरण्यास टाळाटाळ करत करत आहेत.

मुंबईत वाहनचालकांकडून कोणकोणत्या वाहतुकीचे उल्लंघन केले जाते?

• नो-पार्किंग झोनमध्ये पार्किंग.

• हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवणे.

• सीट बेल्ट न लावता कार चालवणे.

• अतिवेगाने वाहन चालवणे.

• सिग्नल जंपिंग.

• वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने.

• दारू पिऊन गाडी चालवणे व इतर .

- वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली कारवाई केली जाते.

- केवळ मुंबईच नाही तर इतर उपनगरांमध्येही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरावे लागणारे कोटींचे आकडे आहेत.

- ठाणे (46 कोटी 49 लाख 43 हजार 50 रुपये),

- वसई विरार ( 1 कोटी 41 लाख 4 हजार 950) 

- मीरा भाईंदर (1 कोटी 18 लाख 73 हजार 400) आणि

-  पालघर (33 लाख 35 हजार 400).

एवढ्या मोठ्या रकमेचा दंड वसूल करण्याचे आव्हान आता वाहतूक पोलिसांपुढे आहे. वाहनचालकांना 14 दिवसांची मुदत असते. परंतु तरी मुदतीत दंड भरत नाहीत. यासाठी दर तीन महिन्यांनी लोकअदालतीचे आयोजन केले जाते. यात दंड असलेल्या वाहनचालकांना बोलावून तडजोड करून दंडाची रक्कम भरण्यास सांगितले जाते. त्यातही कुणी दंड भरला नाही तर त्यांच्यावर खटले दाखल करता येतात.

वाहतूक पोलीस दंड वसुलीसाठी आरटीओ परिवहन आयुक्तांशीही समन्वय साधत आहेत. जर कोणत्याही वाहनचालकाने त्याच्या वाहनांवर दंड केला असेल आणि तो वाहनाची फिटनेस, नाव हस्तांतरण यासारख्या कामासाठी आला असेल तर त्या वाहन चालकाकडून वसुली करणे आवश्यक आहे. ही कारवाई करण्यासाठी वाहतूक अधिकारी आरटीओ कार्यालयात तैनात असतील. त्याचबरोबर गणपतीनंतर वाहतूक पोलीस रस्त्यावरसुद्धा दंड वसुलीचे काम करणार आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर रक्कम भरावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असं आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले आहे. नियमांचे पालन करा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget