एक्स्प्लोर

Mumbai BEST Bus News :  मोठी बातमी! बेस्टच्या ताफ्यातील 400 बसचा वापर तात्पुरता बंद, प्रशासनाने दिले आगीचे कारण

Mumbai BEST Bus News : मुंबईकर प्रवाशांना गुरुवारपासून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. बेस्टकडून कंत्राटी तत्वावरील 400 बस तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai BEST Bus News : मागील काही दिवसांपासून बेस्टच्या बसला (BEST Bus) आग (Fire) लागण्याच्या घटना समोर येत आहेत. आज, बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी अंधेरी पूर्व (Andheri East) येथील आगरकर चौकात सीएनजी बसला आग लागल्याची घटना घडली. बेस्ट बसला आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने बेस्ट प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या 400 कंत्राटी बसेसच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

मुंबईकरांसाठी बेस्ट बस सेवा ही लाईफलाईन समजली जाते. दररोज जवळपास 30 लाखांच्या आसपास प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. मात्र, मागील काही दिवसांत तीन बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या बसेस मातेश्वरी लिमिटेड या कंत्राटदाराच्या ताफ्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज, अंधेरीतील आगरकर चौकात ज्या बसला आग लागली ती बस मातेश्वरी या कंत्राटदाराची आहे. त्यामुळे आता, या कंत्राटदाराच्या ताफ्यातील बसेसची तपासणी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने या बसेसची तपासणी होणे आवश्यक असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. प्रवाशांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

उद्यापासून प्रवाशांना मनस्ताप?

खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने लिजवर बसेस घेतल्या आहेत. तर, दुसरीकडे बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या कमी होत आहे. आता, बेस्ट प्रशासनाने मातेश्वरी लिमिटेडच्या 400 बसेस 'ऑफ रोड' करण्याचा निर्णय घेतल्याने बेस्ट बसचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकाच वेळी एवढ्या प्रमाणावर बसेस धावणार नसल्याने बेस्ट बसच्या वेळापत्रकात बदल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. आधीच मुंबईत विविध कामांमुळे वाहतूक कोंडी असल्याने बस उशिराने धावतात. त्यातच आता, बसची संख्या कमी होणार असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update : देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, ओडिशा सरकारचा 25 जिल्ह्यांमध्ये अलर्ट; बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, 300 वाहने अडकली
देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, ओडिशा सरकारचा 25 जिल्ह्यांमध्ये अलर्ट; बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, 300 वाहने अडकली
Karuna Sharma Munde: वाल्मिक कराडने मला बाथरुमला येईपर्यंत मारलं, आता तुरुंगात सडतोय, धनंजय मुंडेंवरही तीच वेळ येईल: करुणा मुंडे
वाल्मिक कराडने मला बाथरुमला येईपर्यंत मारलं, आता तुरुंगात सडतोय, धनंजय मुंडेंवरही तीच वेळ येईल: करुणा मुंडे
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, देवेंद्र फडणवीस, शरद पवारांचीही उपस्थिती
आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, देवेंद्र फडणवीस, शरद पवारांचीही उपस्थिती
Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल
धनंजय मुंडे साहेब हिरा आहेत, अंजली दमानिया तुमची उंची काय? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 700 AM 20 February 2025 माझं गाव, माझा जिल्हाBakers Issue : नियमांची भट्टी, पावाला धग;मनपाच्या निर्णयाला बेकरी व्यवसायिकांचा विरोध Special ReportZero Hour Full : अजित पवारांचे मंत्री वादाच्या भोवऱ्यात ते पिंपरी चिंचवड, सोलापुरातील समस्याZero Hour : Solapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :सोलापुरात स्वच्छता मोहिम ;अस्वच्छता कराल...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update : देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, ओडिशा सरकारचा 25 जिल्ह्यांमध्ये अलर्ट; बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, 300 वाहने अडकली
देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, ओडिशा सरकारचा 25 जिल्ह्यांमध्ये अलर्ट; बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, 300 वाहने अडकली
Karuna Sharma Munde: वाल्मिक कराडने मला बाथरुमला येईपर्यंत मारलं, आता तुरुंगात सडतोय, धनंजय मुंडेंवरही तीच वेळ येईल: करुणा मुंडे
वाल्मिक कराडने मला बाथरुमला येईपर्यंत मारलं, आता तुरुंगात सडतोय, धनंजय मुंडेंवरही तीच वेळ येईल: करुणा मुंडे
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, देवेंद्र फडणवीस, शरद पवारांचीही उपस्थिती
आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, देवेंद्र फडणवीस, शरद पवारांचीही उपस्थिती
Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल
धनंजय मुंडे साहेब हिरा आहेत, अंजली दमानिया तुमची उंची काय? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Sourav Ganguly Car Accident: सौरव गांगुलीच्या कारचा अपघात, समोरुन ट्रक आला मागून कारची धडक, दादा थोडक्यात वाचला
सौरव गांगुलीच्या कारचा अपघात, समोरुन ट्रक आला मागून कारची धडक, दादा थोडक्यात वाचला
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
Rohit Sharma : रोहित शर्मानं कॅच सुटल्यानंतर मैदानावर हात जोडले, मॅच संपताच अक्षर पटेलला मोठी ऑफर, म्हणाला...
तो कॅच घ्यायला हवा होता, रोहित शर्मानं मॅच संपताच केली घोषणा, अक्षर पटेलला मोठी ऑफर
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Embed widget