एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Mumbai Unlock : फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई 100 टक्के अनलॉक? महापौरांनी दिले संकेत

"फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचं लसीकरण 100% पूर्ण (Covid Vaccination) होईल अशी आशा आहे."

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होणार की काय? अशी भिती एकीकडे असतानाच आता मुंबईकरांसाठी सुखद बातमी आहे.  मुंबई शहरात दैनंदिन कोरोना रुग्णवाढीचा (corona patients) दर आटोक्यात आला आहे. कोरोनाचा कहरही कमी होतोय. त्यामुळे, मुंबईच्या धावत्या चाकांना पुन्हा एकदा गती मिळणार आहे. कारण महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pendnekar) यांनी याबाबत संकेत दिले आहेत. 


फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई 100 टक्के अनलॉक? महापौर म्हणतात...

"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर मुंबईनं लसीकरणाच्या साथीनं कोविडवर नियंत्रण मिळवलं आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचं लसीकरण 100%  पूर्ण (Covid Vaccination) होईल अशी आशा आहे. त्यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली, तर टास्क फोर्सला (Task Force) अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्ण क्षमतेने सुरू केले जाऊ शकतात." अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक (mumbai muncipal corporation elections) तोंडावर आहे.  त्यामुळे मुंबईत राजकिय घडामोडींनाही गती येतेय.त्यामुळेच या महिन्याअखेरपर्यंत मुंबई पुन्हा एकदा अनलॉकच्या तयारीत आहे. मुंबईत सध्या दररेज सरासरी 500 कोरोना रुग्ण आढळत आहेत. हा आकडा कोरोनानं मुंबईत थैमान घातलं होतं,  त्यावेळपेक्षा बराच कमी आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर येते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, नाटय़गृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारीअखेरची कोरोना स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असे संकेत महापालिका प्रशासनानं दिलेत.

अतिरिक्त आयुक्त म्हणतात..

फेब्रुवारी महिनाअखेरीपर्यंत मुंबई शहर 100 टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई शहरात दैनंदीन कोरोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात आला आहे. सध्या शहरात दररोज 500 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत असून संपूर्ण शहरात सध्या केवळ एकच इमारत सील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या आठवड्याभरात मुंबईत 100 टक्के नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

फेब्रुवारी अखेर काय अनलॉक होणार?

-मुंबईतला तिस-या लाटेतला कोरोनाचा कहर आता ब-यापैकी कमी झालाय. 
-त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाटय़गृहे, थीम पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत.  
-ती पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी मिळणार.
-सांस्कृतिक कार्यक्रम, भजने आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये परवानगी
-लग्नसमारंभासाठी सध्या 200 जण उपस्थित राहण्यास परवानगी
-ही मर्यादा हटवणार 

 

आठवडाभरात मुंबईत होणार 100 टक्के लसीकरण 

मुंबईत डिसेंबरअखेरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. यामध्ये रुग्णवाढीचे प्रमाण इतके जास्त होते की, डिसेंबरच्या सुरुवातीला 200 ते 250 पर्यंत नोंदवली जाणारी दैनंदिन रुग्णसंख्या थेट 20 हजारांवर पोहोचली. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारला पुन्हा एकदा निर्बंध कठोर करावे लागले. मात्र सर्वाधिक रुग्णवाढीची तिसरी लाट महिनाभरातच आटोक्यात आल्याने पालिकेने रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी उठवली आहे. शिवाय चौपाट्या, मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. मात्र थिएटर, हॉटेल-रेस्टॉरंट सध्या 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत. येत्या आठवडाभरात मुंबईत 100 टक्के लसीकरण होणार असून मुंबईत पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला आहे. तर दुसरा डोस 96 टक्के पूर्ण झाला आहे. 18 वर्षांपुढील वयोगटातील सर्व सुमारे 92 लाख लाभार्थ्यांचे लसीकरण आठवडाभरात पूर्ण होईल. तर 15 ते 18 वर्षे वयोगटातील 9 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 3 लाख जणांचा पहिला डोस पूर्ण झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे लसीकरणाची आकडेवारी पाहता मुंबई संपूर्ण अनलॉक व्हायला काहीच हरकत नाही...

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9  AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKarveer Kolhapur Voting :  कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात राज्यात सर्वाधिक मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
Embed widget